अमरदिप बडगे, प्रतिनिधी
गोंदिया :- जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील नवेझरी येथील जी.ई. एस.हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय सायबर क्राईम बदल मार्गदर्शन करण्यात आले यावेळी के.वाय.सी फ्रॉड , स्क्रीन शेअर फ्राड, ओएलएक्स फ्राड , केबीसी फ्राड ,लोन , गुगल कस्टमर केअर फ्राड ,फेसबुक प्रोफाईल फ्राड, ॲमेझॉन फ्राड ,व्हाट्सअप व्हिडिओ सेक्सटॉर्षण, कस्टम गिफ्ट फ्राड ,मॅट्रिमोनीयल फ्राड पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या जनजागृती संदेश इत्यादींवर विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी सर्वप्रथम माता सरस्वतीचे पूजन करून व माल्यारपण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक या विद्यालयाचे प्राचार्य सुनील श्रीवास्तव यांनी केले, प्रमुख मार्गदर्शक माधव सिद, पोलीस उपनिरीक्षक, संजय मारवाडी, हेड कॉन्स्टेबल, आशिष अग्निहोत्री, हेड कॉन्स्टेबल, तनुजा मेश्राम, हेड कॉन्स्टेबल अरुणा भांडारकर, हेड कॉन्स्टेबल, ग्राम मंडळाचे अध्यक्ष महेंद्र भांडारकर कार्यक्रमाचे अध्यक्ष, तसेच ओमप्रकाश भांडारकर पोलीस पाटील नवेझरी , सुधीर असाटी,चौधरी, कटरे , झरारिया , केरेकर , शेंडे, ऊके , इत्यादी प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी भांडारकर हेड कॉन्स्टेबल, माधव सिद पोलीस उपनिरीक्षक, यांनी सायबर क्राईम बाबत जनजागृती म्हणून विद्यार्थ्यांना व उपस्थितांना मार्गदर्शन केले संचालन एस.डी.भगत तर आभार के.सी.चौधरी , यांनी मानले.