मुंबई :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात ‘मेरी माटी मेरा देश’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून या अभियानात राज्यातील सर्व शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी सहभागी होणार असल्याचे, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.
‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानाबाबत प्रकल्प अधिकारी यांच्या समवेत मंत्री डॉ. गावित यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, ‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमांतर्गत एका हातात माती घेऊन 10 वर्षावरील आश्रमशाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचा सेल्फ़ी फोटो काढायचा आहे. हे फोटो प्रकल्प कार्यालयाने 23 ऑक्टोबर 2023 पर्यंत त्यांना देण्यात येणाऱ्या लिंक वर अपलोड करायचे आहेत.
या बैठकीस आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, उपसचिव र. तु. जाधव, तसेच दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सर्व अपर आयुक्त,प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.