एफडीसीएम कडून राज्य शासनाला मिळणार 5 कोटी 82 लक्ष रुपयांचा लाभांश!

– महामंडळाच्या स्थापनेपासून मिळालेली आजपर्यंतची सर्वात मोठी रक्कम

– वनविभाग सतत अग्रेसर असल्याचे समाधान : ना. सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर :- महाराष्ट्र वनविकास महामंडळाकडून राज्य शासनाला यावर्षी सन 2022-2023 या वर्षासाठी 5 कोटी 82 लक्ष रुपयांचा लाभांश मिळणे प्रस्तावित असून महामंडळाची स्थापना झाल्यापासून शासनाला प्राप्त होणारा हा सर्वाधिक मोठा लाभांश आहे. 28 डिसेंबर रोजी नियोजन भवन येथे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या महामंडळाच्या संचालक मंडळाच्या (बोर्ड) मिटिंग मध्ये ही माहिती मिळताच ना. मुनगंटीवार यांनी सर्वांचे अभिनंदन केले. विशेष म्हणजे महामंडळाची स्थापना झाल्यापासून राज्य शासनाला मिळणारा हा सर्वाधिक मोठा लाभांश आहे.एफडीसीएम च्या अहवालबाबत सीएजी ने देखील “नील” चा शेरा देऊन अहवालच्या पारदर्शी असल्याबाबत शिक्कामोर्तब केले आहे. हि देखील मोठी उपलब्धी आहे.

यासंदर्भात बोलताना ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, राज्य शासनाला वनविकास महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक फायदा होत असल्याचा मनापासून आनंद होत आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून काम करणाऱ्या मोजक्याच महामंडळाकडून आर्थिक लाभ शासनाला मिळतो त्यात वानविभाग कुठेही मागे नाही, तर सतत अग्रेसर असल्याचे अत्यंत समाधान होत आहे. वनक्षेत्र विकास, बांबू लागवडीला प्रोत्साहन, विक्रमी वृक्ष लागवड, उत्तम दर्जाचे सागवान लावून योग्य विपणन व्यवस्था यांसह प्रत्येक बाबतीत वन विकास महामंडळाचे नियोजन उल्लेखनीय आहे. अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिरासाठी गेलेले काष्ठ, संसदेच्या नवीन इमारतीत सेंट्रल व्हिस्टा साठी गेले काष्ठ महाराष्ट्राच्या वन क्षेत्रातून गेले याचे मला विशेष समाधान आहे असेही ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले. एफडीसीएम चे व्यवस्थापकीय संचालक विकास गुप्ता, वनबल प्रमुख शैलेश टेम्भूर्णीकर आणि त्यांच्या टीम चे यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले.

वन संरक्षण आणि वन्यजीव संवर्धनासाठी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या कुशल नेतृत्वात वनविभाग झपाट्याने प्रगती करीत आहे. नवनवीन संकल्पना राबवून वनक्षेत्र वाढीसाठी तसेच वनांच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्याचे काम गतीने सुरू आहे. एमआयडीसी च्या धर्तीवर एफआयडीसी ची निर्मिती करून फार्निचर व इतर साहित्याकरिता मोठे दालन उभे करण्याचा त्यांचा मानस आहे. यामुळे उद्योगाला आणि रोजगाराला चालना मिळणार आहे.

वनविकास महामंडळाकडून गेल्या दहा वर्षात शासनाला मिळालेल्या लाभांशाचा आढावा घेतल्यास तो सन 2014-2015 मध्ये 45.42 लक्ष रुपयांपासून 2022-2023 मध्ये 582.00 लक्ष रुपये असा प्रगतीचा आलेख अधोरेखित होतो.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ACCUSED FACING DOUBLE MURDER CHARGES RELEASED ON REGULAR BAIL BY HC

Mon Jan 1 , 2024
– Justice Urmila Phalke Joshi has granted regular bail to Shakirabi Kalim Khan and Saminabi Rashid Khan. Nagpur :- Applicants Shakirabi Kalim Khan and Saminabi Rashid Khan were prosecuted by PSO PS Hiwarkhed, Buldhana and they were arrested on 1-07-2023 for the alleged offence punishable U/s 302, 326, 143, 147, 148, 149, 120B of IPC Vide crime no. 114/2023registered by […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!