तालुक्यातील पुरपरिस्थीतीचा घेतला आढावा..

अमरदिप बडगे, प्रतिनिधी

गोंदिया :-  मागील १० दिवसापासून सुरु असलेल्या सततच्या पावसाने देवरी शहरासह तालुक्याच्या ग्रामीन भागात अतिव्रुष्टीचा मोठा फटका बसला आहे. याचीच दखल घेत गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तहसील कार्यालयाचे तहसीलदार अनिल पवार यानीं तालुक्यातील विविध गावांचा दौरा करत पुरपरिस्थीतीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत मंडळ अधिकारी, तलाठी यांची टीम उपस्थित होती.
सध्या सततच्या पावसामुळे नदी – नाल्यानीं रौद्ररूप धारण केले आहे.
त्यामुळे नदी – नाल्यानीं पात्र सोडून धोक्याची पातळी गाठली असल्याने अनेक गावाच्या नजीक पुराचे पाणी आले आहे. तर तालुक्यातील विविध साठवण तलाव आणि नाले तुडुंब भारावून ओव्हरफ्लो होत आहेत. गेल्या चार दिवसात देवरी  तालुक्यात जोरदार  पावसाने हजेरी लावली. महसुल विभागाचे कर्मचारी सोबत घेऊन तालुक्यातील पुरपरिस्थीती राहत असलेल्या भागात शेत पिकांची पाहणी केली. तालुक्यातील डवकी, आदर्श आमगाव, मरामजोब, वडेगाव , व ग्रामीन भागातील अनेक  पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे येथील नागरीकांचा शहरा पासून संपर्क तुटत असतो. या गावानां भेट घेत, शेतकऱ्यांनी केलेल्या भातपीकांच्या लागवटीची तहसीलदारानीं पाहनी केली.

    देवरी तालुक्यातील पुरपरिस्थीतीचा व भात लावणीच्या परिस्थीतीचा आढावा जिल्हाधिकारी यानां सादर करणार असून, नागरिकांना अतिवृष्टी काळात घराबाहेर पडू नये, पुलावरून पाणी वाहत असतानीं जनजीवन विस्कळीत झाले आहे.पूर ओसरल्यानंतर सर्व परिस्थिती पूर्वपदावर येईल, तोपर्यंत नागरिकांनी आपली व आपल्या कुटुंबासोबत पशूंची काळजी घ्यावी. कुठेही अडचणीची परिस्थिती उद्भवल्यास तहसील प्रशासनाला कळवून सहकार्य करावे असे आवाहन  तहसीलदार अनिल पवार यांनी तालुक्यातील जनतेला केला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

सरपंचाच्या सांगण्यावरून खांबावर लावले पथदिवे!

Fri Jul 22 , 2022
नितीन लिल्हारे, प्रतिनिधी विजेचा धक्का लागल्याने त्या युवकांचा गेला बळी सालई खुर्द : मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवेगाव/धुसाळा येथील ग्रामपंचायतचे सरपंच रामकृष्ण पुंडे यांच्या सांगण्यावरून रस्त्यावरील खांबावर पथदिवे लावत असतांना खांबावरील विजेच्या ताराला हाताचा स्पर्श झाल्याने त्याला विजेचा जबर धक्का बसल्याने त्याचा खांबावरच जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्या युवकांचा शव खांबावर लडकून असल्याचे माहिती होताच सरपंच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!