पारशिवनी :- आमडी फाटा ते पारशिवनी मार्गावरील खंडेलवाल मँगनिज कंपनी जवळील अपघातात गंभीर जखमी संदिप धनराज तिजारे युवकाचा शनिवार २६ नोव्हेंबरला उपचारा दरम्यान मृत्यू झाला .नयाकुंड लगतच्या खंडेलवाल मँगनीज कंपनी जवळ बुधवार २३ नोव्हेंबरला कार क्रमाक एम एच४० ए आर २७६६ चालकाने रस्त्यावरील नागरिकांवर कार चढविल्याने सात जण जखमी झाले.
यामध्ये जयंत शेरेकर पोहवा याचा मृत्यू झाला असताना पारशिवनी पोलिसानी अपघाता चा गुन्हा दाखल करून कार चालका विरुध कलम ३०४ अ, एवजी ३०४ भाग२.४२७ अन्वये कलम वाढ करण्यात आलेली आहे . आणी जख्मी पैकी गभीर जखमी संदीप धनराज तिजारे ( ३५ , रा . मेहंदी , ता . पारशिवनी ) गंभीर जखमी झाले . त्यांना उपचारार्थ नागपूरच्या शासकीय रुग्णालयात हलविले शनिवारी उपचारा दरम्यान त्यानंचा मृत्यू झाला.