नागपूर :- 19 मार्च रोजी होणाऱ्या नागपूर विद्यापीठातील पदवीधर सिनेट अधिसभेच्या निवडणुकीत सिनेट परिवर्तन पॅनल संपूर्ण शक्तीनिशी उतरले असून पॅनल ने यापूर्वी आठ उमेदवारांचे अर्ज भरले होते. आज महिला प्रवर्गातून शबीना शेख व अनुसूचित जमाती (आदिवासी) प्रवर्गातून ऍड राजेंद्र मरसकोल्हे यांनी अर्ज भरला.
आज अर्ज भरताना त्यांचे सोबत अमोल थूल, उत्तम शेवडे, नितेश सीडाम, प्रल्हाद कुमरे, रितेश जांभुळकर, अरमान खान, आशिष तितरे, अंकित राऊत प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सिनेट परिवर्तन पॅनल च्या कोर कमिटीचे प्रतिनिधी उत्तम शेवडे यांनी उमेदवारांना पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले.