लेखणीतून सामान्यांना न्याय देण्याची पत्रकारांची भूमिका – प्रा.डॅा.अशोक उईके

– जेष्ठ नागरिक भवनात पत्रकार दिन साजरा

यवतमाळ :- स्वातंत्र्यपुर्व व स्वातंत्र्यानंतरच्या काळातही पत्रकारांची भूमिका मोलाची राहिली आहे. लेखणीच्या माध्यमातून पत्रकारांनी सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे सेवाव्रत कायम ठेवले. एक मोठा वारसा जिल्ह्याच्या पत्रकारीतेला असून पत्रकाराचा सन्मान आयुष्यभर बाळगू, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी केले.

जेष्ठ नागरीक भवनात श्रमीक पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. मंत्री अशोक उईके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, जेष्ठ पत्रकार अनिरुध्द पांडे, श्रमीक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत राऊत, सचिव अमोल ढोणे उपस्थित होते.

प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांनी केले. मराठी भाषेतील दर्पन हे पहिले वृत्तपत्र 6 जानेवारी 1832 रोजी सुरु केले. त्यामुळे हा दिवस मराठी पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो. लेखणीच्या माध्यमातून संविधानातील अधिकार व हक्क सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्याची भूमिका पत्रकारांची राहिली आहे. मला आगामी काळात एक चांगले आरोग्य शिबीर घेण्याच्या दृष्टीने आपले सहकार्य राहिल, असे त्यांनी स्पष्ट केले. सोबतच पत्रकार भवनाच्या संदर्भातही पुढाकार घेउन मदत करु, अशी ग्वाही त्यांनी दिली.

सर्वोत्तम पत्रकार भवन यवतमाळात निर्माण झाले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी आपण पुढाकार घेऊ, अशी हमी त्यांनी दिली. कार्यक्रमाचे अतिथी तथा जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड यांनीही आपल्या भाषणातून जिल्ह्यातील पत्रकारांची भूमिका नेहमी सहकार्याची राहत असल्याचे भाष्य केले. जेष्ठ पत्रकार अनिरुध्द पांडे यांनी पत्रकारीतेच्या बदलत्या संदर्भावर भाष्य केले. एखादी बातमी सुटल्याची खंत वाटणे हे पत्रकारीता जिवंत असल्याचे लक्षण होय, असे ते म्हणाले. कुणासोबत कसेही संबंध असले तरी पत्रकाराने सत्य मांडले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

प्रास्ताविक श्रीकांत राऊत यांनी केले. कार्यक्रमाचे संचलन केशव सवळकर यांनी केले. आभार सुरेंद्र राऊत यांनी मानले. या कार्यक्रमाला पत्रकार दिनेश गंधे, गणेश बयास, नितीन पखाले, राजकुमार भितकर, नितीन भागवते, अविनाश साबापुरे, विवेक गावंडे, विवेक कवठेकर, नागेश गोरख, गणेश राऊत, मेहमुद नाथानी, रुघुवीरसिंह चव्हाण, विरेंद्र चौबे, चेतन देशमुख, रुपेश उत्तरवार, प्रविण देशमुख, अमोल शिंदे, किशोर जुनुनकर, प्रा. विवेक विश्‍वरुपे, दिपक शास्त्री, संजय सावरकर, श्‍याम वाढई, तुषार देशमुख, मनिष जामदळ, अतुल राऊत, सुधीर मानकर, लक्ष्मणलाल खत्री, विवेक वानखेडे, जयंत राठोड, संजय राठोड, नितीन भुसरेड्डी, राहूल वासनिक, विजय बुंदेला, अनिकेत कावळे, मकसूद अली, सय्यद मतीन सय्यद मुनाफ, रवीश वाघ, गौतम गायकवाड, नितीन राऊत, श्‍याम आरगुलवार आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

डाक विभागाच्या ई-बायसिकल यात्रेचे यवतमाळात स्वागत

Tue Jan 7 , 2025
यवतमाळ :- भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र आणि गोवा सर्कलचे चीफ पोस्टमास्टर जनरलच्या मार्गदर्शनात राज्यस्तरीय टपाल तिकिटांचे भव्य प्रदर्शन महापेक्स -२०२५ दि.२२ ते २५ जानेवारी दरम्यान वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या ई-बायसिकल यात्रेचे यवतमाळात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. प्रदर्शनाच्या जनजागृतीसाठी सेवाग्राम एक्सप्रेस आणि रायगड एक्सप्रेस या नावाने डाक विभागाच्या दोन ई-बायसिकल चमू […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!