संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- वाढती महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्य माणसाला महावितरणने वीज दरवाढीचा शॉक दिला आहे.वीज बिलात 25 ते 30 टक्क्यांनी वाढ करण्यात आली असून स्थिर आकारही वाढवण्यात आला आहे.एप्रिल पासून प्रतियुनित वीजदर आणि स्थिर आकार दरात वाढ केल्याने आताचे वीज बिल 25 ते 30 टक्क्यापर्यंत वाढुन अली असल्याने सामान्य ग्राहक हैराण झाले आहे.घरगुती,व्यवसायिक,औद्योगिक साठीचे वीजबिल थकले तर तातडीने वीज पुरवठा खंडित केला जातो त्यामुळे ग्राहक नाईलाजास्तव वाढीव बिल भरताना दिसत आहे.
घरगुतीसाठी पूर्वी 100 युनिट पर्यंत 4 रुपये 41 पैसे वीज दर होता आता तो 4.71 पैसे झाला आहे.300 युनिट पर्यंत 9 रुपये 64 पैसे होता आता 10 रुपये 29 पैसे झाला आहे.500 युनिट पर्यंत 13 रुपये 61 पैसे होता आता 14 रुपये 55 पैसे झाला आहे.500युनिट च्या पुढे प्रति युनिट 15 रुपये 57 पैसे होता आता 16 रुपये 64 पैसे झाला आहे,व्यवसायिकाच्या 20 किलोवाट चा प्रति युनिट पूर्वी 8 रुपये 27 पैसे दर होता आता 8 रुपये 52 पैसे झाला आहे.50 किलोवाट पर्यंत 12 रुपये 63 पैसे होता आता 13 रुपये 1 पैसे दर झाला आहे.50 किलोवाटच्या पुढे प्रतियुनिट 14 रुपये 93 पैसे होता आता 16 रुपये 38 पैसे झाला आहे.एकीकडे सर्वसामान्य माणूस महागाईत होरपडत असताना दुसरीकडे महावितरणने वीज दरवा ढीचा शॉक दिल्याने सर्वसामान्याचे कंबरडे मोडले आहे.