मोतीराम रहाटे, प्रतिनिधी
रेती चोरीला अंकुश लावण्यास दंडात्मक कारवाई केली जाणार – तहसिलदार प्रशांत सांगळे
कन्हान (नागपुर) : – पारशिवनी तालुका महसुल विभागाच्या पथकाने कन्हान पो स्टे अंतर्गत मौजा खडाळा (घटाटे) मार्गावर महसुल विभाग पथकाचे तलाठी फरहान शेख यांनी क्षमते पेक्षा अधिक रेती वाहतुक करणारा ट्रक पकडुन रेती सह ट्रक जप्त करण्यात आला असुन ट्रक चालक व मालकावर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
सोमवार (दि.१३) ला दुपारी २.१५ वाजता दरम्यान मौजा खंडाळा (घटाटे) मार्गावरून रेतीची वाहतुक केली जात असल्याची माहिती मिळताच महसुल विभाग पथकाचे तलाठी फरहान शेख यांनी खंडाळा मार्गाची सोमवारला दुपारी पाहणी केली. यात त्यांना ट्रक क्र. एम एच ४०/बी जी – १६९२ ट्रॅक येताना दिसला. त्या ट्रॅकला थांबवुन पाहणी केली असता ट्रॅकच्या ट्रॉली मध्ये श्रमते पेक्षा अधिक रेती आढळुन येताच पथकाने कागदपत्रांची तपासणी केली . तेव्हा रेती विना रॉयल्टी वाहतुक करित असल्याचे व श्रमतेपेक्षा अधिक रेतीची अवैद्य वाहतुक असल्याचे स्पष्ट होताच त्यांनी रेती सह ट्रॅक ताब्यात घेत जप्त केला व कन्हान पोलीस स्टेशन च्या स्वाधिन करण्यात आला. याप्रकरणी ट्रॅक चालक दुर्गा बोपचे रा. बिडगाव पारडी व मालक नरेंद्र शर्मा रा. नागपुर या दोघांच्या विरोधात महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६ चे कलम ४८ ( ७ ) व ( ८ ) अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महसुल विभाग प्रमुख तह सिलदार प्रशांत सांगळे आणि तलाठी फरहान शेख यांनी दिली. रेती चोरीवर अंकुश लावण्यास ट्रक चालक व मालक यांचे वर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.