नागपूर : ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ निमित्त महानिर्मितीने राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन केले होते. या राज्यस्तरीय स्पर्धांना विविध जिल्ह्यातून उत्तम प्रतिसाद मिळाला. या स्पर्धांचा निकाल जाहीर झाला असून विविध स्पर्धांचे विजेते खालीलप्रमाणे आहेत.
राज्यस्तरीय माध्यमिक गट चित्रकला स्पर्धा याकरिता ‘पर्यावरण संवर्धन/ अपारंपारिक ऊर्जा’ हा विषय देण्यात आला होता. यामध्ये प्रथम क्रमांक शर्वरी संदीप हिवरखेडकर इ. १०वी, कोराडी व पलक सचिन सोनसकर इ. ७ वी, वर्धा यांना विभागून देण्यात आला असून द्वितीय क्रमांक अर्जुन राहुल अग्रवाल इ.१०वी शेंदुर्णी -पाचोरा तसेच उन्नती नितीन पाटील इ. ९ वी पाचोरा, जळगाव आणि तृतीय क्रमांक रिया एस. भगत इ. ८वी, नागपूर व निरंजन प्रशांत परदेशी इ. ८वी, नाशिक यांना विभागून देण्यात आला आहे.
राज्यस्तरीय खुला गट चित्रकला स्पर्धा यामध्ये द्वितीय क्रमांक स्नेहल खरोटे, कल्याण तसेच अभिजीत श्रीकांत कुलकर्णी, मुंबई यांना व तृतीय क्रमांक नीरज मोहन सबनीस, सोलापूर आणि किरण मेकाले, परळी वैजनाथ यांना विभागून देण्यात आला आहे.
राज्यस्तरीय लघुपट/मोबाईल क्लिप स्पर्धा याकरिता ‘राष्ट्रनिर्मितीत महिलांचे योगदान/ ऊर्जेचे अपारंपारिक स्त्रोत – नवसंकल्पना किंवा ऊर्जा आणि मानव’ हा विषय देण्यात आला होता. या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक सुनीता हंडोरे-पाटील यांना प्राप्त झाला असून तृतीय क्रमांक करिता बाबासो भीमराव देसाई, शिगाव तालुका वाळवा तसेच सीमा खंदारे, मुंबई हे संयुक्त विजेते ठरले आहेत.
तसेच महानिर्मितीच्या कर्मचाऱ्यांकरीता ‘महानिर्मिती – काल, आज व उद्या’ या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये प्रथम क्रमांक मधुकर श्रावण दुफारे, चंद्रपूर व शोभा सुब्रमण्यम, भुसावळ यांना विभागून तर द्वितीय क्रमांक प्रियंका काटकर, मुंबई व रवींद्र भिकाजी कुशारे, मुंबई यांना विभागून देण्यात आला असून तृतीय क्रमांकाकरिता पराग दिनकर झाडे, खापरखेडा व प्रदीप मनोहर जांभुळकर, कोराडी हे संयुक्त विजेते ठरले आहेत.
या राज्यस्तरीय स्पर्धातील विजेत्यांचे महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अन् बलगन तसेच संचालक (वित्त) बाळासाहेब थिटे, संचालक (संचलन/प्रकल्प)) संजय मारुडकर तसेच संचालक (खनिकर्म) दिवाकर गोखले आणि वरिष्ठ व्यवस्थापन यांनी अभिनंदन केले आहे. महानिर्मितीचे मुख्यालय प्रकाशगड येथे विशेष कार्यक्रमामध्ये विजेत्यांना पारितोषिक देऊन नजीकच्या काळात गौरवण्यात येणार आहे, सदर निकाल हा www.mahagenco.in या महानिर्मितीच्या संकेतस्थळावरही प्रसिध्द करण्यात येणार आहे.