नागपुरात होणार 1 हजार किलो आंबील बनविण्याचा विक्रम, कॅन्सर वॉरिअर शेफ नीता अंजनकर रचणार विक्रम!

नागपूर :- नागपुरातील कॅन्सर वॉरिअर, प्रसिद्ध शेफ नीता अंजनकर यांच्या नेतृत्वात 1 हजार किलो आंबील बनविण्याचा विश्वविक्रमी उपक्रम रविवार, २८ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ८ वाजता संचेती ज्युनिअर कॉलेज, साईबाबा मंदिरासमोरील भागात, वर्धा रोड, नागपूर येथे आयोजित होत आहे. हा विश्वविक्रमी उपक्रम शंखनाद न्यूज चॅनलच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.

ही स्पर्धा कर्करोगाविरूद्ध लढा देणाऱ्या लोकांना प्रेरणा देण्यासाठी आणि त्यांच्या साहसी कार्याचा सन्मान करण्यासाठी आयोजित केली जात आहे. तसेच यंदाचे वर्ष सुरक्षित, शाश्वत आणि निरोगी भविष्यासाठी भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्यासंदर्भात जागृती करण्यासाठी ही स्पर्धा आणि विश्वविक्रमी उपक्रम होत आहे.

रविवार दिनांक 28 एप्रिल रोजी ‘कॅन्सर वॉरिअर’ शेफ नीता अंजनकर 1 हजार किलो आंबील तयार करण्याचा आगळावेगळा विक्रम करण्याचा प्रयत्न करणार आहेत. ही आंबील ही एक अद्भुत पाककलाकृती ठरणार आहे आणि ती निश्चितच नागपूरकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनेल. या उपक्रमाद्वारे शेफ नीता अंजनकर यांच्या पाककला कौशल्याची आणि सर्जनशीलतेची झलक पाहायला मिळेल.

रविवार, २८ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ११ वाजता संचेती ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित समारंभात हजार किलोच्या आंबीलीचे वितरण आणि पाककला स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे. नागपूरकर नागरिकांनी या अद्भुत कार्यक्रमात सहभागी होऊन पाककलाकृतीचा आनंद घेण्याचे आवाहन शंखनाद न्यूज आणि महाराष्ट्र टेलीकम्युनिकेशन्सच्या संचालक मंडळांने केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

इलेक्ट्रॉनिक के दुकान में‌ लगी आग, १८ लाख का माल जलकर खाक

Sun Apr 28 , 2024
– काटोल पुलिस थाने के पीछे की घटना काटोल :- काटोल नगर परिषद के पुरानी पानी की टंकी के सामने तथा काटोल पुलीस स्टेशन के नाले पीछे के नगर परिषद ने नाले पर स्लैब डालकर वाणिज्यिक दुकानों का निर्माण किये गये है. इसका निर्माण किया है, साथ ही इसी मार्ग पर लोगों ने फुटपाथ पर अलग-अलग दुकानें लगा रखी हैं, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!