नागपूर – महाविकास आघाडीच्या काळातच महाराष्ट्राच्या बाहेर गेलेले प्रकल्प शिंदे-फडणवीस सरकारमुळे राज्याबाहेर गेल्याचे सांगुन संभ्रम निर्माण करणाऱ्या महाविकास आघाडीचा जाहीर निषेध आज भाजयुमो नागपुर महानगराकडुन आय.टी. पार्क, चौक, नागपुर येथे आक्रामक आंदोलन करून करण्यात आला. यावेळी भाजयुमोकडुन महाविकास आघाडीचा पुतळा फुंकुन तीव्र निषेध व्यक्त केला.
वेदान्त फॅाक्सकॅान, टाटा एअरबस, सॅफरॅानसह अन्य प्रकल्प राज्यातून गुजरातमध्ये नेण्यात येत आहेत असे अतिशय खोटे आरोप विरोधक करत आहेत. याच मुळे भाजयुमोनी आंदोलन करीत महाविकास आघाडीच्या खोटारडेपणाचा निषेध केला.
महाविकास आघाडीच्या काळातच राज्याबाहेर गेलेले प्रेकल्प शिंदे-फडणवीस सरकारमुळे बाहेर गेल्याचे निखालस खोटे आरोप करीत विरोधक विद्यमान सरकारला बदनाम करीत असल्याचा आरोप यावेळी भाजयुमोने केला.
राज्यातील शिंदे फडणवीस सरकार चांगले काम करीत असल्याने आरोप करणाऱ्यांचे चांगलेच फावले असून त्याचाच फायदा घेत ते खोटी माहिती पसरवत असल्याचा आरोप यावेळी भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे यांनी केला.
तसेच हे सर्व प्रकल्प महाविकास आघाडीच्याच काळात राज्याबाहेर गेले असल्याची माहिती भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र विक्की पटले यांनी दिली. वेदान्त फॅाक्सकॅान बाबत त्यांनी सांगितले की तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी वेदान्त फॅाक्सकॅान प्रकाल्पाला विरोधदखवत प्रकल्प महाराष्ट्रात होणार नाही अशी घोषणा ७ जानेवारी २०२० ला केली होती तसेच टाटा एअरबस या प्रकल्प संदर्भात उद्धव ठाकरे सरकारकडुन कोणताही प्रस्ताव मागील अडीच वर्षात कंपनीला पाठवलेला नसल्याची माहिती यावेळी दिली.
आंदोलनाला प्रमुख्याने भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे, प्रदेश उपाध्यक्ष विष्णु चांगदे, प्रदेश सचिव कल्याण देशपांडे, प्रदेश सचिव राहुल खंगार हे उपस्थित होते.
आंदोलन भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले यांच्या नेतृत्वात करण्यात आले. सोबत भाजयुमो प्रदेश सदस्य देवदत्त डेहणकर, सारंग कदम, रितेश राहाटे, भाजयुमो शहर महामंत्री सचिन करारे, दिपांशु लिंगायत, अमोल तिडके, मंडळ अध्यक्ष निलेश राऊत, शेखर कुर्यवंशी, सन्नी राऊत, पंकज सोनकर, अमर धरमारे, बादल राऊत, शहर संपरेक प्रमुख सचिन सावरकर, शौनक जाहागीरदार, वैभव चौधरी, घनश्याम ढाले, डिंपी बजाज, संकेत कुकडे, प्रसाद मुजुमदार, मनमित पिल्लारे, गौरव हरडे उपस्थित होते.