संदीप बलविर ,प्रतिनिधी
सरपंच उमेश भोले यांचा कचरा मुक्त ग्राम बनविण्याचा संकल्प
कचरा गाडीचे लोकार्पण
नागपूर :- तालुक्यातील सोनेगाव (बोरी) या गावाला स्वच्छ,सुंदर व कचरा मुक्त बनविण्याचे ध्येय मनाशी ठाणून येथील नवनिर्वाचित सरपंच उमेश भोले यांनी १५ वित्त आयोग अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन करण्याकरिता ७४ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दि २६ जाणे ला कचरा गाडीचे लोकार्पण करून गावाला स्वच्छते कडून समृद्धीकडे नेण्याकरिता प्रथम पाऊल टाकले आहे.
नागरिकांना आपले गाव कसे स्वच्छ,सुंदर व रोगराई मुक्त राहील याकरिता सर्व गावकऱ्यांनी कोणत्या उपाय योजना कराव्यात व गावात राबवित असलेल्या स्वच्छता अभियानाला सहकार्य करावे असे आवाहन केले.
यावेळी ग्रा प उपसरपंच अजय माडेकर, ग्रा प सदस्य प्रमोद खापणे, राजेंद्र पिदूरकर रंजना सोनूरले, प्रीती धोमने, मंगला मिलमिले, कांता श्रावनकर, माजी सरपंच राजु भोयर, अशोक मिलमीले, शरद कुबडे माजी उपसरपंच, अनुप नागपुरे, शंकर खापणे, युसूफ सवारे जेष्ठ नागरिक रामाजी मिलमीले, महादेव माडेकर,दत्तूजी सोनवणे,अजय तुळणकार व सचिव भालचंद्र आंबूलकर ग्रा प कर्मचारी दुर्योधन शेंडे, समीर नागपुरे सह गावातील खूप सारे ग्रामस्थ उपस्थित होते.