आश्रमशाळेतील भोजनाच्या ई-निविदेची प्रक्रिया महिन्याभरात पूर्ण करणार – मंत्री डॉ. विजयकुमार गावित

मुंबई : आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या भोजनाची गैरसोय होऊ नये म्हणून अन्नधान्य पुरवठा करण्यासाठी १३४ कोटी ४० लाखांची ई-निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. महिनाभरात ही प्रक्रियापूर्ण होईल. विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचा पोषण आहार पुरविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी विधान परिषदेत सांगितले.

राज्यातील आदिवासी विभागाच्या आश्रमशाळांकरीता अन्नधान्य खरेदीच्या निविदा प्रक्रियेबाबत सदस्य रमेश पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, मनीषा कायंदे, कपिल पाटील यांनी उपप्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री डॉ.गावित म्हणाले की, काही तांत्रिक कारणास्तव ई-निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यास विलंब झाला. एक महिन्याभरात ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. तोपर्यंत मुख्याध्यापकांना सात-सात दिवसांचे धान्य खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यापुढे या निविदेनुसार कंत्राटाची मुदत दोन वर्षाची करण्यात येणार आहे. जेथे शक्य आहे तेथील आश्रमशाळा आणि वसतिगृहात थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धत वापरली जाते. तर जास्तीत जास्त ठिकाणी सेंट्रल किचन सुरू करीत असल्याचे मंत्री डॉ.गावित यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

क्रांतीदेवी सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त म.न.पा.तर्फे अभिवादन

Sat Mar 11 , 2023
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने अज्ञानतेचा अंधार नाकारुन ज्ञान प्रकाशाला जीवनाचे ध्येय बनविणा-या विद्येच्या क्रांतीज्योती आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त मनपा केन्द्रीय कार्यालयात स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त अजय गुल्हाने यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. या प्रसंगी अति.आयुक्त राम जोशी, उपायुक्त रविंद्र भेलावे, तंत्रज्ञान संचालक महेश धामेचा, कार्यकारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com