आमदार विकास ठाकरे यांना निवेदन देताणा संजय सोलव, अनिल पारखी कृषि नगरवाशी
दाभा :-कृषि नगर दाभा येथील बऱ्याच वर्षापासून समस्या प्रलंबित आहे .आमदार विकास ठाकरे यांच्या निदर्शनात आणून दिले कृषी नगर येथील रोड खूप खराब झाले आहे अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.आणि गडर लाईन चे काम झाले नाही सांडपाणी हे लेआऊट लागूनच बाजूने वाहत असते बराच मच्छर चा त्रास होतो बऱ्याच लोकांना डेंग्यू सारख्या बिमारीचा सामना करावा लागला आणि इतर समस्या घेऊन पच्छिंम विधानसभा मतदार संघाचे तडफदार लोकप्रिय आमदार विकास ठाकरे यांच्या दरबारी घेऊन गेले आमदार यांनी आपला बराच किमती वेळ आम्हला दिला .आमच्या कृषी नगर च्या समस्या ऐकून घेतल्या बऱ्याच विषयवार चर्चा करण्यात आल्या आमदार लवकरात लवकर समस्या मार्गी लावू. असे आश्वासन दिले. कृषि नगर च्या समस्याकडे जातीने लक्ष देऊन कृषि नगर वाशियांच्या समस्या दूर करू असे आश्वासन दिले.
उपस्थित कृषि नगर येथील संजय सोलव,अनिल पारखी व कृषि नगरवाशी