नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकाता येथील रुग्णालयात जाऊन रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष श्रीमत स्वामी स्मरणानंद महाराज यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
एक्स या समाजमाध्यमांवर पंतप्रधानांनी पोस्ट केले:
“कोलकाता येथे पोहोचल्यावर, रुग्णालयात जाऊन रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष, स्वामी स्मरणानंद महाराज यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
लवकरात लवकर त्यांच्या तब्येतीत उत्तम सुधारणा व्हावी यासाठी आपण सर्व प्रार्थना करत आहोत.”