सातगाव येथे भव्य खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन.

संदीप बलविर,तालुका प्रतिनिधी

– धर्मवीर संभाजी बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम

नागपूर :- बुटी बोरी जवळील धर्मवीर संभाजी बहुउद्देशीय संस्था सातगाव तर्फे येत्या १६ जानेवारीला त्रिमूर्ति हनुमान मंदीर परिसरात संभाजी चषक कबड्डी स्पर्धेच्या खुल्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

दोन दिवसीय या कबड्डी स्पर्धेत प्रथम पारितोषिक ऍड राजकुमारी रॉय यांचेकडून ४१ हजार रोख व चषक,द्वितीय पुरस्कार माणिकराव मुरस्कर यांचेकडून ३१ हजार रोख व चषक,तृतीय पुरस्कार स्व सखुबाई डोईफोडे स्मृती प्रित्यर्थ सुरेश डोईफोडे यांचेकडून २१ हजार रोख व चषक तर चतुर्थ पुरस्कार प्रकाश घायवट यांचेकडून ११ हजार रोख व चषक देण्यात येईल तसेच या स्पर्धेतील उत्कृष्ट रेडर, डिफेडर,अष्टपैलू खेळाडू यांना फ्रीज,एल इ डी टीव्ही,मोबाईल,सायकल,सिलिंग फॅन यासारखे अनेक पुरस्कार वितरित केल्या जाईल.

या सामन्यांच्या उद्घाटनाप्रसंगी उद्घाटक म्हणुन माजी मंत्री व आमदार सुनील केदार,अध्यक्ष म्हणून माजी मंत्री रमेशचंद्र बंग तर प्रमुख उपस्थित म्हणुन उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा गायकवाड,माजी आमदार विजय घोडमारे पाटील,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अहमदबाबू शेख,उपसभापती प्रकाश नागपुरे, जी प सदस्य दिनेश बंग आदी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.कबड्डी सामन्यांच्या समापन सोहळ्याप्रसंगी १८ जानेवारीला बक्षीस वितरणाकरिता करीता माजी मंत्री रमेशचंद्र बंग,माजी आमदार विजय घोड़मारे,वामन सातपुते,पोलीस निरीक्षक भिमाजी पाटील,अशोक कोळी,सुधाकर धामन्दे,योगेंद्र धांदे आदी मान्यवर उपस्थित राहणार असून या कबड्डी स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता धर्मवीर संभाजी बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष योगेश सातपुते आणि समस्त कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोबाईल केले परत.

Sat Jan 14 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र :- येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प सेवा योजना कार्यालयाकडून कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दैनंदिन काम काजाकरिता देण्यात आलेले निकृष्ट दर्जाचे शासकीय मोबाईल अखेर आज शुक्रवारी सर्व अंगणवाडी ,बालवाडी सेविका कर्मचारी युनियन पदाधिकाऱ्याद्वारे बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना परत केले. कामठी तालुक्यांतील सर्व अंगणवाडी कार्यकर्त्यांना अंगणवाडीतील दररोजची हजेरी झालेली लसीकरण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights