महावितरणचा ग्राहक होतोय हायटेक ऑनलाईन वीजबिल भरणा-यांचा टक्का वाढला

नागपूर :- वीज ग्राहकांना सदैवच आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सेवा पुरविण्यासाठी कटिबद्ध असलेल्या महावितरणने लघु व उच्च दाब ग्राहकांना विजबिल भरण्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. या आधुनिक सुविधांचा वापर करीत महावितरणच्या नागपूर परिमंडलातील तब्बल 53.67 टक्के लघुदाब वीज ग्राहकांनी आणि शंभर टक्के उच्चदाब ग्राहकांनी ऑनलाईन वीजबिल भरण्यास पसंती दिली आहे. विशेष म्हणजे जुन महिन्याच्या तुलनेत हे प्रमाण तब्बल 8 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. मागिल काही वर्षात ऑनलाईन वीजबिल भरणा-या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ऑक्टोबरमहिन्यात नागपूर परिमंडलातील 7 लाख 86 हजार 962 ग्राहकांनी 207 कोटींपेक्षा अधिकचा म्हणजेच 63.15 टक्के रकमेच्या वीजबिलांचा भरणा घरबसल्या आणि सुरक्षितपणे ऑनलाईन पद्धतीने केला आहे.

महावितरणने आपल्या ग्राहकांसाठी संकेतस्थळासोबतच, महावितरण मोबाईल ॲप, पेमेंट वॉलेट आणि इतरही ऑनलाईन सेवांच्या माध्यमातून वीजबिलांचा भरणा करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे, या सेवांची व्याप्ती आणि सहज वापर यामुळे ग्राहकांचा कल यांचेकडे सातत्याने वाढत आहे. शहरी ग्राहकांसोबतच ग्रामिण भागातील वीज ग्राहकही या सेवांचा लाभ मोठ्या प्रमाणात घेत असल्याचे दिसून येत असून वीजबिल भरण्यासाठी तासनतास रांगेत उभे न राहता अवघ्या काही मिनिटांत वीजबिलांचा भरणा करता येणे शक्य झाले आहे. याशिवाय वीज बिलाचा एसएमएस येताच त्याच लिंकवरून वीजबिल भरण्याची सुविधा असल्याने वेळीच बिलांचा भरणा केल्यामुळे ग्राहकांना विलंब आकाराचा भुर्दंड ही भरावा लागत नाही याउपरांत अनेक ग्राहक वेळीच बिल भरणा करून बिलाच्या रकमेत मिळणारी सवलत मिळवित आहेत.

नागपूर परिमंडलांतर्गत असलेल्या नागपूर ग्रामिण मंडलातील 1 लाख 57 हजार 77 ग्राहकांनी म्हणजेच 46.01 टक्के ग्राहकांनी 36.23 कोटी रुपये म्हणजेच 59.84 टक्के रकमेचा बिल भरणा ऑनलाईन पद्धतीने केला आहे तर नागपूर शहर मंडलातील 5 लाख 5 हजार 323 म्हणजेच 60.31 टक्के ग्राहकांनी 148.58 कोटींचा म्हणजेच 65.89 टक्के रकमेचा ऑनलाईन बील भरणा केला आहे याशिवाय वर्ध मंडलातील 1 लाख 24 हजार 562 म्हणजेच 43.43 टक्के ग्राहकांनी 22 कोटी 84 लाख म्हणजेच 53.41 टक्के रकमेचा ऑनलाईन बिल भरणा केला आहे.

सुट्टीच्या दिवशी वीजबिल भरणा केंद्र सुरु

एकूणच ऑनलाईन वीजबिल भरणा करणा-या ग्राहकांची वाढती संख्या बघता महावितरणची ही सेवा दिवसेंदिवस अधिकाधिक लोकाभिमूख होत असल्याचे दिसून येत असून दरम्यान, चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी शनिवार, रविवार व सुटीच्या दिवशी देखील वीज भरणा केंद्र सुरु राहणार आहेत.

दिवाळीच्या सुटीत बाहेर जाण्यापूर्वी वीजबिल भरा

काही दिवसांवर आलेल्या दिवाळ सणासाठी शाळा आणि महाविद्यालयांसोबतच कार्यालयांना असलेली सलग सुट्टी बघता अनेकांनी बाहेर फिरायला जाण्याचे नियोजन केले असणार, या गडबडीत वीज बिल भरायचे शिल्लक राहिले तर थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित होण्याची कारवाई शक्य असल्याने ऑनलाईन पद्धतीने कधीही आणि कुठुनही वीजबिलांचा भरणा करुन वीजपुरवठा खंडित होण्याची कारवाई टाळण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यात प्रथमच वृक्षारोपनासाठी नरेगासोबत 'टॉप अप मॉडेल' राबविणार - बी. वेणूगोपाल रेड्डी

Wed Nov 8 , 2023
Ø वनाच्छादनात वाढ करण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय Ø ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी वाढणार   नागपूर :- महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वन विभागात वनीकरण आणि जलसंधारणाची कामे अभिसरण (टॉप अप मॉडेल) योजनेअंतर्गत राज्यात प्रथमच राबविण्यात येणार आहेत. नरेगाच्या मजुरीच्या फरकाची रक्कम या योजनेतून देण्यात येणार असल्यामुळे वन क्षेत्रात वृक्षारोपणाला प्रोत्साहन मिळेल व रोजगाराच्या संधीत वाढ होइल असे प्रतिपादन वन विभागाचे प्रधान […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!