महाराष्ट्रातील अन्यायग्रस्त भटके विमुक्त, वंचित, उपेक्षित, आदिवासी तसेच भोई व पारधी समाजाला न्याय मिळवून देण्याकरिता पक्ष रस्त्यावर उतरणार- भाऊसाहेब बावणे

मुंबई येथील भारतीय जन सम्राट पक्षाच्या बैठकीत नगर पालिका आणि महानगरपालिका निवडणुका लढण्याचा निर्णय

मुंबई :- भारतीय जन सम्राट पार्टीची राज्यव्यापी बैठक व्यंजन हॉल अंधेरी वेस्ट मुंबई येथे बुधवार दिनांक 9 नोव्हेंबर 22 रोजी पार पडली या वेळी महाराष्ट्रात होणाऱ्या नगर पालिका व महानगरपालिका निवडणुकीत पक्ष आपले उमेदवार लढविणार असून महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी त्या करीता सज्ज राहण्याचे आवाहन उदघाटन पर भाषणात राष्ट्रीय अध्यक्ष भाऊसाहेब बावणे यांनी केले महाराष्ट्रात भटके विमुक्त ,वंचित,उपेक्षित , आदिवासी तसेच विशेषतः भोई व पारधी आणि अन्यायग्रस्त समाजाला न्याय मिळवून देण्याकरिता पक्ष महाराष्ट्रात रस्त्यावर उतरणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले या सभेत पक्ष मजबूत करण्या करिता प्रत्येक जिल्ह्यात पक्षाच्या संघटनात्मक बैठकी घेण्याचे निश्चित करण्यात आले या वेळी मुंबई येथील सिने सुष्टी मधील सिने डायरेक्टर अडमीन थॉमस, अनिलकुमार शिंपी,आणि भोजपुरी चित्रपट सिने अभिनेता सतेंद्र कुमार राजपूत यांनी भारतीय जन सम्राट पार्टीत प्रवेश केला चित्रपट कामगार आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. कुशाशु माक जेबीएस यांनी कार्यकर्त्यांना होम ग्राउंड वर जन संपर्क अभियान राबवून शासनाच्या योजना सर्व सामान्यां पर्यंत पोहचविण्यासाठी पुढाकार घ्यावा तसेच महाराष्ट्रात पक्षाचे सदस्यता अभियान राबविण्याच्या सूचना केल्या.

यावेळी पारधी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष तथा पक्षाचे अनु जमातीचे प्रदेश अध्यक्ष संतोष पवार यांनी पारधी समाजावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पक्षाने सहकार्य करावे संपूर्ण महाराष्ट्रातील पारधी समाज ताकदीने पक्षाच्या पाठीशी उभा राहणार असल्याचे मत व्यक्त केले तर भोई समाज सेवा संघाचे सुरेश तायडे यांनी सर्व समाज या पक्षाच्या पाठीशी उभा राहून लवकरच मुंबईत पक्षाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे सांगितले या वेळी पक्षाचे प्रदेश संपर्क प्रमुख विजय करवंदे,राष्ट्रीय कोषाध्यक्ष कलीम पठाण,प्रदेश उपाध्यक्ष गणेश वानखडे,सुरेश तायडे मुंबई,गणेश बावणे मुंबई जिल्हाध्यक्ष,देविदास मोरे प्रदेश उपाध्यक्ष पनवेल,चित्रपट डायरेक्टर आडमिंन थॉमस,अभिनेता सतेंद्र कुमार राजपूत यांनी मार्गदर्शन केले या वेळी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली सभेचे संचालन अनिलकुमार यांनी तर आभार प्रदर्शन विजय करवंदे यांनी केले.

 

 

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

श्री गुरू नानक जयंती निमित 'सिंग' यांचा सेवाभावी उपक्रम

Thu Nov 10 , 2022
नागपूर :-  संपूर्ण जगाला बंधूभाव, एकात्मता, सलोखा आणि शांततेचा संदेश देणारे शीख धर्माचे संस्थापक व प्रथम धर्मगुरू श्री गुरू नानक देव यांच्या जयंती अर्धात प्रकाश पर्व नागपुरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री गुरू नानक देव यांच्या जयंतीनिमित सिंग बार्बे क्यू व करी यांच्या वतीने सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत गुरुद्वारात आलेल्या भाविकांसाठी लंगरची सोय करण्यात आली. या लंगरच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com