श्री दत्तात्रैय प्रभुच्या पालखी यात्रेने दुमदुमले कांद्री शहर

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– हरिनाम भागवत सप्ताह कार्यक्रमाने श्री दत्तात्रैय जयंती महोत्सव संपन्न. 

कन्हान :- कांद्री येथे श्री दत्तात्रैय जयंती महोत्सव निमित्य बुधवार (दि.२०) ते बुधवार (दि.२६) डिसेंबर पर्यंत असे सात दिवसीय हरिनाम भागवत सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करुन विविध कार्यक्रम, पालखी यात्रा काढुन महाप्रसाद कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता करीत श्री दत्तात्रेय जयंती उत्साहाने थाटात साजरी करण्यात आली.

बुधवार (दि.२०) डिसेंबर श्री दत्तात्रैय मंदिरात महिलांनी व नागरिकांनी घटस्थापना व दिपज्योत जाळुन विधिवत पूजा अर्चना करुन साप्ताहिक कार्य क्रमाचा शुभारंभ करण्यात आला. दररोज सकाळी ६ ते ७ वाजता पर्यंत काकड भजन, आरती सकाळी ७ ते ९.३० व दुपारी ४ ते ५.३० वाजे पर्यंत श्रीमद भागवत पारायण, दुपारी मडिला मंडळ कांद्री द्वारे १२.३० ते ३.३० वाजे पर्यंत रामायण पाठ रात्री ७ ते ९ वाजे पर्यं त भारुड, हरि किर्तन कार्यक्रम करण्यात आला. मंगळ वार (दि.२६) ला सकाळी १० वाजता दत्तात्रैय मंदिरात महिलांनी नागरिकांनी पुजा अर्चना करुन मंदिरातुन श्री दत्तात्रैय प्रभुची पालखी यात्रा काढण्यात आली.

पालखी यात्रा राष्ट्रीय महामार्गाने संताजी नगर होत जय शितला माता मंदिर येथे पोहचली असता मंदिर कमेटी द्वारे फुलांच्या वर्षाने, अल्पोहार वितरित करुन पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले. पालखी राष्ट्रीय महामार्गाने कांद्री येथे पोहचुन नगर भ्रमण करु न मंदिरात पालखीचे समापन करण्यात आले. बुधवार (दि.२७) ला सकाळी ९ ते ११ वाजे पर्यंत श्री दत्तात्रैय मुर्तीचे अभिषेक, हवन कार्यक्रम करुन दुपारी १ ते ३ वाजे पर्यंत ह.भ.प. घनश्यामजी जैवार महाराज मु. देवी यांचे गोपाल काल्याचे किर्तन व सायंकाळी ५ वाजे पासुन आगमना पर्यंत महाप्रसाद कार्यक्रम करुन महोत्सवाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता गावातील महिलांनी, भाविक नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहुन सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अंमली पदार्थांची तस्करी करत असलेल्या केनियाच्या महिलेला, महसूल गुप्तमाहिती संचालनालयाने (डीआरआय) घेतले ताब्यात

Sat Dec 30 , 2023
मुंबई :- डीआरआयला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर, केक्यू 204 या नैरोबीहून मुंबईला आलेल्या विमानातील, केनियाचे नागरिकत्व असलेल्या एका महिलेला, ‘डीआरआय’ च्या अधिकाऱ्यांनी आज (28.12.23) मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताब्यात घेतले. तिच्या सामानाची तपासणी केली असता, 1490 ग्रॅम वजनाची आणि काळ्या बाजारात 14.90 कोटी रुपये मूल्य असलेली बहुतेक कोकेनची पांढरी पावडर मिळाली आणि ती जप्त करण्यात आली. केसांना लावण्‍यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com