बुद्ध जयंतीनिमित्त विहारा विहारात गुंजतोय धम्मदेसना ची गुंज

संदीप कांबळे, कामठी

–दहा दिवसीय विश्व शांती धम्मदेसना कार्यक्रम
कामठी ता प्र 10:-आजच्या वर्तमान स्थितीत जगावर युद्धाचे सावट पसरले आहे या परिस्थितीतून समस्त मानव जातीला जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणीक तथागत गौतम बुद्ध यांचे विचारच या बिकट परिस्थितीतून बाहेर काढू शकतात.वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने संपूर्ण विश्वात शांतता स्थापित व्हावी, बुद्धांचे विचार पुनःश्च अंगीकृत केले जावे आणि मानव सदमार्गाला लागावा म्हणून भारतीय बौद्ध महासभा कामठी शाखा, समता सैनिक दल कामठी आणि कामठी च्या समस्त विहार शाखांच्या वतीने 6 ते 16 मे पर्यंत कामठी तील विहारा विहारात विश्व शांती धम्मदेसना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून विहारा विहारात विश्व शांती धम्मदेसनाची गुंज गुंजताना दिसत आहे.
हे धम्मदेसना कार्यक्रमाची सुरुवात 6 मे ला झाली असून दररोज सकाळी साडे सहा ते रात्री 9 वाजेपर्यंत धम्मदेसना सुरू असते. या धम्मदेसना कार्यक्रमाचा शुभारंभ जयभीम चौकातील प्रज्ञा शिल करुणा बुद्ध विहारातुन करण्यात आला असून यावेळी धर्म आणि धम्मातील अंतर या विषयावर भन्ते ज्ञानबोधी यांनी धम्मदेसना केली.यामध्ये सिद्धार्थ बुद्ध विहार,चंद्रमनी बुद्ध विहार,नाग बुद्ध विहार,राहुल बुद्ध विहार संलग्नित होते.7 मे ला धम्म दीप संघ बुद्ध विहार, 8 मे ला प्रबुद्ध विहार, 9 मे ला हरदास बुद्ध विहार, 10 मे ला तथागत बुद्ध विहार,11 मे ला सम्यक संबुद्ध विहार,12 मे ला धम्म साधना संघ बुद्ध विहार, 13 मे ला आनंद बुद्ध विहार,14 मे ला गौतम बुद्ध विहार तर ,15 मे ला तथागत वेल्फेअर बुद्ध विहार येथे धम्मदेसना कार्यक्रमांचा समारोप होईल.तर 16 मे ला बुद्ध जयंती विशेष कार्यक्रम घेण्यात येईल.तसेच रात्री 8 वाजता समस्त विहाराविहारातून विश्व शांती कँडल मार्च काढून जयस्तंभ चौक येथे या कँडल मार्च चा समापन करण्यात येईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

राज्यातील विमानतळ विकासासाठी कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Tue May 10 , 2022
अकरा लाख प्रवाशांचा टप्पा पार करून शिर्डी विमानतळाने केली गौरवास्पद कामगिरी व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांचा सन्मान मुंबई, दि. 10 : राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी राज्य शासनामार्फत व्यापक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.कोल्हापूर,चिपी (सिंधुदुर्ग), नांदेड, गोंदिया व नाशिक विमानतळावरून विमानसेवा सुरू असून देशातील प्रमुख तीर्थस्थळ असलेल्या शिर्डी विमानतळाने ११ लाख ५८ हजार प्रवाशांचा टप्पा पार करून गौरवास्पद कामगिरी केली आहे असे गौरवोद्गार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com