संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
– कामठी तालुक्यात 39 गोवंश जनावरराना लम्पी स्किन आजाराचा विळखा
कामठी ता प्र 20 : गोवंशीय जनावरांमध्ये उदभवलेल्या विषाणूजन्य लम्पी चर्म रोगाचा कामठी तालुक्यात शिरकाव झाला असून काल 19 सप्टेंबर ला कामठी तालुक्यातील पांढरकवडा गावात 11 गोवंश जनावरे लम्पी चर्म रोगाने बाधित आढळले होते त्यातील लम्पी स्किन आजराने ग्रस्त गायीची संख्या वाढली असून आज 14 जनावरांची संख्या वाढली तसेच नजीकच्या आडका गावात सुद्धा लम्पी स्किन आजाराने ग्रस्त 14 गायी आढळल्या आहेत त्यानुसार आजपावेतो कामठी तालुक्यात लम्पी स्कीन आजाराच्या शिरकावात लम्पी स्किन ग्रस्त गायीची संख्या ही 39 झाली आहे.जनावरांना चावणाऱ्या माशा,डास, गोचीड चिलटे यामार्फत लम्पी या भयानक संसर्गजन्य आजाराचा झपाट्याने प्रादुर्भाव होत आहे त्यामुळे 20 हजाराच्या वर असलेल्या जनावरांवर केवळ सात डॉक्टर कधी इलाज करणार या लाडक्या जनावराच्या काळजीपोटी पशुपालक धास्तावले आहेत.
कामठी तालुक्यातील असलेल्या सात पशुवैद्यकिय रुग्णालयात कामठी, कोराडी व वडोदा या तीन ठिकाणी वर्ग 1 चे तर गुमथळा, भुगाव, टेमसना व महालगाव या चार ठिकाणी श्रेणी 2 चे पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. तर फक्त या सात डॉक्टर वर तालुक्यातील इतक्या मोठ्या जनावरांची इलाज करण्याची पाळी आली आहे त्यामुळे तालुक्यातील पशुपालकानी लम्पी आजाराची धास्ती घेतली आहे.
सध्या महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पशुधनामध्ये उदभवलेल्या लम्पी चर्म रोगाने थैमान घातले आहे. प्रथमता कामठी तालुक्यातील पांढरकवडा गावात 25 तसेच आडका गावात 14 गोवंश जनावरात विषाणूजन्य लम्पी रोगाचा प्रादुर्भाव आढळुन आला आहे.माहिती मिळताच एसडीओ श्याम मदनूरकर, तहसिलदार अक्षय पोयाम, बीडीओ अंशुजा गराटे, तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ लीना पाटील यांनी पांढरकवडा तसेच आडका गावात भेट देत नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत काळजी घेण्याचे आवाहन केले तसेच गावापासून 5 किमी परिघातील परिसरात लम्पी रोगाचे लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहे.या रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी येथील प्रशासन तत्पर असल्याचे मत एसडीओ मदनूरकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले.