संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नागपूर जबलपूर महामार्गावरील ऑटोमोटिव्ह चौक ते आशा हॉस्पिटल पर्यंत मेट्रोच्या उडानपूल बांधकामाचे कार्य प्रगतीपथावर कामाला गती देण्यात आली आहे.मात्र या कामादरम्यान या मार्गावरील पथदिवे बंद ठेवल्यामुळे येथील वाहतुकदाराना रात्रीच्या वेळी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे रस्ता निमुळता झाला असून वाहतूक जोमात सुरू असते त्यातच पथदिवे बंद असल्यामुळे दैनंदिन अपघात होत असतात तर मागील आठ दिवसात अपघाताच्या मोठ्या घटना घडल्या असून काही वाहतुकदारांचा अपघाती मृत्यू झाला आहे.तेव्हा मेट्रोचा हा मनमानी कारभार बंद होत अपघाताच्या घटनांवर आळा बसावा यासाठी या मार्गावरील पथदिवे सुरू करण्यात यावे तसेच जागोजागी योग्य त्या ठिकाणी बॅरिकेट्स लावावे या मागणीसाठी खैरी ग्रामपंचायत चे सरपंच योगिता किशोर धांडे, भिलगाव ग्रा प च्या सरपंच भावना फलके यांनी मेट्रो नागपूर चे प्रबंधक तसेच नॅशनल हायवे नागपूर चे कार्यकारी अभियंता यांना निवेदनातून केली आहे.तसेच ही मागणी पूर्ण होत पथदिवे सुरू करण्यासह इतर सुरक्षात्मक दृष्टिकोनातुन उपाययोजना न केल्यास जण आंदोलन उभारण्यात येईल असा ईशारा देण्यात आला.याप्रसंगी माजी सरपंच किशोर धांडे ,निखिल फलके आदी उपस्थित होते.