विदर्भ भूषण पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांचा सन्मान
नागपूर :-देशासह राज्यात सामाजिक व आर्थिक विषमतेची दरी कमी करण्याची जबाबदारी सामाजिक कार्यकर्त्यांची आहे. समाजाप्रती जबाबदार राज्यकर्ते राहिले नाही ज्यांना कारागृहात जायला पाहिजे ते आपल्यावर शासन करत आहेत. त्यामुळेसमाजसुधारणेची जबाबदारी आपल्यावर येवून पडते. म्हणून समाजकारणाला सक्षम करण्याची गरज समाजसुधारकांची आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक लेखक विचारवंत डॉ. प्रदिप आगलावे यांनी केले. यशवंत भारती लोककल्याण संस्था एनजीओ नागपूर आयोजित विदर्भातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना विदर्भ भूषण पुरस्कार सोहळ्यात ते उद्घाटीय भाषणात बोलत होते.
हिंदी साहित्य संमेलन नागपूरच्या अर्पण सभागृहात पार पडलेल्या समारोहात अध्यक्षस्थानी जागतिक बॅंकेचे माजी सल्लागार डॉ रमेश ठाकरे तर मुख्य अतिथी म्हणून इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाचे रिजनल डायरेक्टर डॉ पि. शिवस्वरूप, यशवंत भारती लोककल्याण संस्था एनजीओ नागपूर संस्थेचे अध्यक्ष प्रा.भूषण भस्मे व कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष पूजा भस्मे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. डॉ प्रदिप आगलावे पुढे म्हणाले कि, विविध क्षेत्रातील मान्यवरांना हा पुरस्कार देवून समाजात काम करणाऱ्या मान्यवरांना प्रेरणा व उर्जा देणारा आहे. त्यामुळे त्यांची समाजाप्रती जबाबदारी वाढली आहे असेही ते म्हणाले.
तत्पूर्वी यशवंत भारती लोककल्याण संस्था एनजीओ नागपूर आयोजित समारोहात विविध क्षेत्रात समाजभिमुख कार्य करणाऱ्यांना विदर्भ भूषण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी डॉ रमेश ठाकरे यांच्या हस्ते चंद्रपाल चौकसे रामटेक, ज्ञानेश्वर रक्षक, प्रा प्रतापसिंह चौव्हान नागपूर, डॉ अनिल जवादे, डॉ. उमेश वावरे हिंगणघाट, डॉ. प्रिती तोटावार पांढरकवडा, डॉ हेमंत सोनारे, डॉ मंगेश देशमुख, अमरावती डॉ. प्रकाश घवघवे, डॉ ज्ञानेश्वर राउत अकोला इत्यादी चा विदर्भ भूषण पुरस्कार देऊन विशेष गौरव करण्यात आला. त्याचबरोबर, डॉ हर्षवर्धन गोखले, डॉ हेमंत जामदार, डॉ रमेश राठोड, डॉ सुभाष कोंडावार, डॉ राममोहन वानखेडे,सागर डबरासे, कमला मोहता, मीना पाटील, संजय शेंडे, प्रशांत ढोले,शाम जांगडे, माणिक खोब्रागडे, मनोहर गजभिये आदींचा विदर्भ भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचाही याप्रसंगी मोमेंटो शाॅल प्रमाणपत्र बुके देवून सन्मान करण्यात आला. यामध्ये पत्रकार राजेश बागडे, पत्रकार पियूष पाटील, वसंतराव लांडगे, डॉ सविता कांबळे, कुमूद रहाटे,विकल जिल्हेकर, नागेश वाहुरवाघ,सतिश सोमकुवर,माधव जांभूळे, अविनाश हाडके, नरेंद्र वनकर, विनोद आटे,अभिषेक थुलकर आदींचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सावित्री प्रबोधनी मंच च्या महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सुरवातीला प.पु. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला माल्यार्पन द्वीप प्रज्वलित करण्यात आले संविधान प्रास्ताविकेचे वाचन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रा.भूषण भस्मे यांनी भूमिका मांडत असताना विदर्भ भूषण पुरस्कार हा एक ब्रॅंड आहे विदर्भाची अस्मिता जागृत करणारा आहे आपण सारे विदर्भात राहतो विदर्भावर अन्याय होतो हे मान्य करावे लागते विदर्भ आंदोलनाला १२५ वर्षांचा इतिहास आहे देशात प्रचंड सामाजिक व आर्थिक विषमता आहे ही दुरी कमी करायची असेल तर सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी जबाबदारी आहे. विदर्भ भूषण पुरस्कार हा घरुन मीळालेली थाप आहे. हा सोहळा नागरिक सत्कार आहे कारण हा लोकवर्गणीतून सन्मान होतो आहे.
अध्यक्षीय भाषणात डॉ रमेश ठाकरे यांनी यशवंत भारती लोककल्याण संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली विदर्भ भूषण पुरस्कार हा कोण्या व्यक्तीचा नसून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव आहे. समाजाला अशा कर्तृत्ववान माणसांची गरज आहे त्यांना प्रोत्साहित करुन उर्जा देण्याचे काम संस्था करते आपण हा पुरस्कार स्वीकारला त्याबद्दल आपले स्वागत करतो शुभेच्छा देतो याप्रसंगी डॉ पि.शिवस्वरूप , डॉ मंगेश देशमुख, डॉ अनिल जवादे, ज्ञानेश्वर रक्षक, चंद्रपाल चौकसे प्रा.प्रतापसिंग चौव्हान, आदींनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रोषनी वैरागडे, अमर बागडे यांनी केले आभार पुजा भस्मे यांनी मानले कार्यक्रमाला वामन नील, अक्षय राऊत, निरंजना आदे, सुजाता मेश्राम, अर्चना मोहोड, स्नेहल मोरे, श्रध्दा लेंढे,आशा साठवणे, आरती राऊत राजेश्री बागडे प्रतिक्षा चहांदे इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले.