मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने केली विविध विषयांवर चर्चा

– सिंचन, धानाचे बोनस, धान खरेदी व विकास कामाबाबद खा. प्रफुल पटेल यांचे पत्र देऊन शिष्टमंडळाने दिले निवेदन

गोंदिया/भंडारा :- शासन आपल्या दारी या उपक्रमानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित  पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भंडारा येथे आले होते. दरम्यान शहापूर येथील मैदानात माजी आमदार राजेंद्र जैन यांनी तिन्ही मान्यवरांचे स्वागत केले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने गोंदिया, भंडारासह विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना धानाचे बोनस जाहीर करावे, दोन्ही जिल्ह्यात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्याची सूचना करावी, गोंदिया- भंडारा जिल्ह्यातील रखडलेली विकास कामांना मजुरी प्रदान करून अधिक गतिमान करावे आदी विषयावर खा. प्रफुल पटेल यांचे पत्र देऊन निवेदन केले व चर्चा केली.

यावर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाले. यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन यांच्यासोबत माजी मंत्री नाना पंचबुद्धे, आमदार राजु कारेमोरे, सुनील फुंडे भंडारा जिल्हा राईस मिल असोसिएशन चे अध्यक्ष, धनंजय दलाल, माजी खा. मधुकरराव कुकडे तसेच भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जनप्रतिनिधी , पदाधिकारी आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) देशभरातील सर्व बांधकामाधीन बोगद्यांचे सुरक्षा लेखा परीक्षण करणार

Thu Nov 23 , 2023
– देशभरातली बोगद्यांचे बांधकाम मजबूत करण्यासाठी एनएचएआय ने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड बरोबर केला सामंजस्य करार नवी दिल्ली :- महामार्गांवरील बोगद्यांच्या बांधकामा दरम्यानची सुरक्षा आणि उच्च दर्जाच्या मानकांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) देशभरातील सर्व 29 बांधकामाधीन बोगद्यांचे सेफ्टी ऑडिट, अर्थात सुरक्षा लेखा परीक्षण करणार आहे. एनएचएआय चे अधिकारी, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (DMRC) तज्ञांचे पथक तसेच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com