मनपा आयुक्तांनी केली चौकांच्या विकास कामांची पाहणी

नागपूर :- शहरातील वाहतुक सुरक्षित व सुरळीत होण्याचे दृष्टीने नागपूर महानगरपालिकेमार्फत विविध चौकांच्या विकासाची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. सोमवारी (ता.१) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी विविध चौकांना भेट देउन पाहणी केली.

मनपा आयुक्तांच्या पाहणी दौ-यामध्ये अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, कार्यकारी अभियंता (वाहतूक) रवींद्र बुंधाडे, कार्यकारी अभियंता (विद्युत) राजेंद्र राठोड आदी उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिकेद्वारे श्रध्दानंदपेठ चौक, गंगाबाई घाट चौक, वर्धमान नगर चौक, छापरु नगर चौक, गांधी पुतळा चौक, सेवा सदन चौक व जापानी गार्डन चौक आदी चौकांची विकासकामे सुरु करण्यात आलेली आहेत. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सोमवारी श्रध्दानंद पेठ चौक तसेच जापानी गार्डन चौक येथे भेट देऊन सुरु असलेल्या कामाचा आढावा घेतला. श्रद्धानंद पेठ चौकातील पाहणी दरम्यान चौकात सुरळीत व सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने तसेच पादचा-यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याबाबत त्यांनी निर्देश दिले.

जापानी गार्डन चौकाच्या पाहणी दरम्यान राजभवन कडून चौकात येणा-या रस्त्यावर होत असलेली वाहतूक कोंडी दूर करण्याकरिता व सदर ठिकाणी अतिमहत्वाच्या व्यक्तींचे होत असलेल्या आवागमनाच्या दृष्टीने तज्ज्ञ वाहतूक सल्लागाराकडून अभिमत घेण्याकरीता मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी निर्देशीत केले. चौकात असलेले अनावश्यक विद्युत खांब हटविण्याबाबत तसेच सिग्नल पोस्ट सुस्थितीत करण्याबाबत कार्यकारी अभियंता यांना निर्देश दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी घेतला निवडणूक तयारीचा आढावा

Tue Apr 2 , 2024
Ø सी-व्हिजील ॲपवरील तक्रारींवर वेळेत कारवाई Ø मद्यविक्री अचानक वाढल्यास विक्रीची चौकशी यवतमाळ :- आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी सर्व नोडल अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून निवडणूक तयारीचा आढावा घेतला. निवडणुकीदरम्यान करावयाची कामे वेळेत पुर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर, उपजिल्हाधिकारी श्री.गायकवाड, अभिमन्यू बोदवड, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com