महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागीय कार्यालयाने 16.91 कोटी रुपये मूल्याचे 22.89 किलो सोने आणि भारतीय चलनातील 40 लाख रुपयांचा ऐवज केला जप्त

मुंबई :- मुंबई सेंट्रल परिसरात तस्करी केलेले सोने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणाऱ्या तीन जणांना, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी विशिष्ट गोपनीय माहितीच्या आधारे पकडले. त्यांच्या सामानाची झडती घेतली असता विविध स्वरुपात (वितळलेल्या सोन्याच्या पट्ट्या, अंडाकृती कॅप्सूल, पट्ट्या, साखळी) तस्करी केलेले 22.89 किलो सोने जप्त करण्यात आले.

तस्करी केलेल्या सोन्याच्या विक्रीतून मिळालेले 40 लाख रुपये एका घरात लपवून ठेवण्यात आले होते, त्याची झडती घेण्यात आली आणि संपूर्ण रक्कम जप्त करण्यात आली.

एकूण 16.91 कोटी रुपये किंमतीचे 22.89 किलो सोने आणि तस्करी केलेल्या सोन्याच्या विक्रीतून मिळालेले भारतीय चलनातील 40 लाख रुपये सीमाशुल्क कायदा, 1962 च्या तरतुदीनुसार जप्त करण्यात आले तसेच सर्व 3 जणांना अटक करण्यात आली आणि त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रधानमंत्री 31 अगस्त को तीन वंदे भारत रेलगाड़ियों को रवाना करेंगे

Fri Aug 30 , 2024
– ये रेलगाड़ियां उत्तर प्रदेश, तमिलनाडु और कर्नाटक में कनेक्टिविटी को बढ़ावा देंगी – नई वंदे भारत रेलगाड़ियां यात्रियों को विश्व स्तरीय सेवाएं प्रदान करेंगी, यात्रा के समय को कम करेंगी और पर्यटन को बढ़ावा देंगी नवी दिल्ली :-प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी 31 अगस्त, 2024 को दोपहर साढ़े 12 बजे वीडियो कॉन्फ्रेंसिंग के माध्यम से तीन वंदे भारत रेलगाड़ियों को रवाना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com