छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक मनाचा ठाव घेणारे असे भव्य व्हावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

तुळापूरवढू (बु.) येथील स्मारकांबाबत शिखर समितीची बैठक

            मुंबई :- स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक पाहताक्षणीच मनाचा ठाव घेणारे असे असावेअसे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले.

            स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे शिरूर तालुक्यातील वढू (बु) व हवेली तालुक्यातील तुळापूर येथे  आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक प्रस्तावित करण्यात आले आहे. याबाबतचा आराखडा आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीसमोर सादर करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

            बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवारगृहमंत्री दिलीप वळसे-पाटीलमहसूलमंत्री बाळासाहेब थोरातसार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणसांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुखखासदार डॉ.अमोल कोल्हे (दूरदृश्य प्रणालीद्वारे) आमदार अशोक पवारमुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे,मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंहवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिकनियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे,  मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे उपस्थित होते.

            मुख्यमंत्री ठाकरे म्हणालेछत्रपती संभाजी महाराज आपल्या हृदयात आहेतच. त्यांचे स्मारक देखील मनाचा ठाव घेणारे आकर्षक आणि भव्य असावे. संभाजी महाराजांचे आयुष्य संघर्षमय असे होते. त्यांच्या कारकिर्दीत अनेक चढ उतार होते. त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचे प्रतिबिंब हे स्मारक पाहणाऱ्यांच्या मनात उमटावेत इतके भव्यदेखणे आणि अर्थपूर्ण असे स्मारक असले पाहिजे. त्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना सादर केल्या जाव्यात. त्या त्रिमितीय स्वरुपात सादर करण्यात याव्यातअसे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

             उपमुख्यमंत्री पवार म्हणालेतरुणांमध्ये ऐतिहासिक वास्तूगड किल्लेस्मारक याबाबत मोठे आकर्षण आहे. अशा  ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता गर्दी होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून सर्वसमावेशक आकर्षक स्मारक झाले पाहिजे तसा आराखडा पुन्हा शिखर समितीसमोर सादर करावा.

            महसूल मंत्री थोरात म्हणाले,  देश-विदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या पर्यटकांना देशात आल्यानंतर किंवा राज्यातील पर्यटकांना सुद्धा हमखास या स्मारकास  भेट द्यावी असे वाटावे इतके सुंदर,माहितीपूर्ण आणि आपल्या इतिहासाची साक्ष देणारे हे स्मारक असावे तसा आराखडा तयार करून  नियोजन करावे.

            सार्वजनिक बांधकाम मंत्री  चव्हाण म्हणालेस्मारक करताना विविध संकल्पना यामध्ये राबविल्या पाहिजे. बहुपर्यायी असा आराखडा तयार करून स्मारक उभारताना यामध्ये नाविन्यता आणि  आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर  करावा.

            सांस्कृतिक कार्य मंत्री देशमुख म्हणालेस्मारकांच्या ठिकाणी जयंती व बलिदान दिन या दोन्ही दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. येणाऱ्या नागरिकांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत.तसेच या भागातील पूररेषेचा अभ्यास करून हा आराखडा तयार करावा असे यावेळी सांगितले.

            पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सादरीकरण केले. भिमा-भामा आणि इंद्रायणी नदीच्या त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी स्मारक साकारण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्थसंकल्पातही तरतूद करण्यात आली. तुळापूर येथे आठ एकर तर वढू (बु) येथे सुमारे ४ एकर क्षेत्रावर स्मारक परिसर साकारण्यात येणार आहे. शिखर समितीपुढे सादर केलेल्या आराखड्यात स्मारक परिसरात भव्य शिल्पॲम्फीथिएटरप्रवेशद्वारइमारत बांधकामघाट बांधकामसंग्रहालयप्रेक्षागृहप्रकाश व ध्वनी शोपायाभूत सुविधांतर्गत पाण्याच्या टाक्याविद्युतीकरणसौर ऊर्जा पॅनलरेन वॉटर हार्वेस्टिंगअग्निशमन यंत्रणासंरक्षक भिंत याबरोबरच अस्तित्वातील समाधीचा जीर्णोद्धार आदी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.

            या बैठकीस विभागीय आयुक्त सौरभ रावपुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे आदी मान्यवर व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

राज्यात २३ नवीन संवर्धन राखीव, ५ अभयारण्ये

Thu Jun 16 , 2022
पर्यावरणस्नेही विकासाचा आग्रह कायम- मुख्यमंत्री             मुंबई : राज्यात मागील अडीच  वर्षात  १७५०.६३ चौ.कि.मीचे २३ नवीन संवर्धन राखीव,  ६४७.१२९४  चौ.कि.मी ची  ५  नवीन अभयारण्ये आणि  ८५.८९ हेक्टरच्या ४ जैवविविधता वारसा स्थळांची निर्मिती ही हरित  महाराष्ट्राची ध्येयवादी वाटचाल दर्शवित असून या माध्यमातून राज्याच्या संरक्षित वनाचे क्षेत्र वाढतांना वन्यजीवांचा भ्रमणमार्गही सुरक्षित होतांना दिसत आहे.  शासनाने नेहमीच पर्यावरणस्नेही विकासाला प्राधान्य दिले असून शाश्वत विकासाचा तो महत्वाचा आधार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!