संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- देशातील स्वातंत्र्याला 75 वर्षे अमृत महोत्सव पूर्ण झाले असताना सुद्धा बौद्धगया महाविहार बौद्ध अनुयायांचा असतानाही बौद्धांच्या ताब्यात नाही.
बिहारमध्ये ज्या ठिकाणी तथागत गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्त झाले आणि मानविय जगाला दुःख मुक्तीचा मार्ग सांगितला.
सम्राट अशोकाने महाबोधी महाविहाराची स्थापना केली. ते विहार ब्राह्मणांच्या ताब्यात आहे.तो मुक्त व्हावे यासाठी आज 3 मार्च ला कामठी शहरातील जयस्तंभ चौक कामठी येथील परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात समता सैनिक दल कामठी,भारतीय बौद्ध महासभा कामठी,बौद्ध प्रशिक्षण संस्थान कामठी व कामठी महिला संघ व विविध आंबेडकरी संघटनेच्या वतीने एक दिवसीय धरणा आंदोलन करीत तहसील कार्यालय वर पायी मोर्चा नेऊन तहसीलदार मार्फत महामहिम राष्ट्रपतीला निवेदन सादर करण्यात आले.
देशातील भिक्षु संघाच्या वतीने बौद्धगया येथे 12 फेब्रुवारी पासून आमरण उपोषण सुरू असून या आमरण उपोषणात सहभागी भन्तेजींचे स्वास्थ्य बिघडत आहे.यांच्या जीवाला काही झाल्यास केंद्र सरकार व राज्य सरकार जवाबदार राहील. जगातील कुठल्याही परिस्थितीत अथवा राज्यात धार्मिक स्थळ हे त्याचं लोकांच्या व्यवस्थापणेकडे दिलेले असते त्यामुळे हे महाबोधी महाविहार बौद्धांच्या हाती देण्यात यावी या मागणीसाठी आज एक दिवसीय धरणा आंदोलन करून पायी मोर्चा काढण्यात आले.व राष्ट्रपतीला निवेदन सादर करण्यात आले.याप्रसंगी समता सैनिक दल,युनिट कामठी ,भारतीय बौद्घ महासभा कामठी,कामठीमहिला संघ,बौद्ध प्रशिक्षण संस्थेचे पदाधिकारी सदस्य गण सह विविध आंबेडकरी संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येत उपस्थित होते.