राज्य बास्केटबॉल स्पर्धा पक्षपाती?
नागपुर – औरंगाबाद मध्ये 12 तारखे पासून सुरू असलेल्या राज्यस्तरीय मुलांच्या बास्केटबॉल स्पर्धेत (अंडर-18) नागपूर ची टीम कोचच्या पक्षपाती नीतीमुळे पराभुत झाल्याचा आरोप करण्यात आला.
12 डिसें पासून सुरू झालेल्या नागपूरच्या टीमला पुण्याने हरविले. 13 ला नागपूरने औरंगाबाद ला हरविले. 14 ला साताऱ्याला हरविले. 15 ला मुंबई सोबत झालेल्या कॉर्टर मध्ये नागपूर ची टीम पराभूत झाली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की नागपूर मधून गेलेल्या टीम मधील फक्त 5 पाच खेळाडूंनाच खेळविण्यात आले. व 5 खेळाडूंना चारही दिवस सर्व मॅचेस मध्ये परमनंट बसवून ठेवण्यात आले. (चित्रांश-जयेश 1 मिनिटांचा अपवाद)
या 5 मध्ये नागपूर जिल्हा स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरलेल्या व 16 बास्केट टाकलेल्या आदर्श शेवडे ला चार दिवस चाललेल्या या स्पर्धेत एकदाही उतरविण्यात आले नाही. त्याने कदाचित विजयश्री मिळवून दिला असता. त्याच्या सोबत परिक्षीत, यश, चित्रांश, जयेश ह्या 4 खेळाडूं बाबत अनुप मस्के या कोच द्वारे हेच धोरण स्वीकारण्यात आले. याचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे. हार पुढे दिसत असताना राखीव खेळाडू ह्यांना जर मैदानात उतरविले असते तर कदाचित चित्र वेगळे राहिले असते.
आदर्श यापूर्वी केंद्रीय विद्यालयाद्वारे बेंगलोर येथे झालेल्या (अंडर 14) राष्ट्रीय स्तरावर खेळलेला असून त्याने टीमचे नेतृत्व सुद्धा केले. त्याला कल आपली चुणूक दाखविण्याची संधीच कोच ने हिसकली याचे वाईट वाटते.