महिला व बाल कल्याण समितीच्या आढावा बैठकीत गाजला निकृष्ट आहार पुरवठाचा मुद्दा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

-निकृष्ट आहार पुरविणाऱ्या कंत्राट दाराचा कंत्राट रद्द करा-प्रा अवंतिका लेकुरवाडे

कामठी :- राज्याच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागात अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत त्यानुसार कामठी तालुक्याच्या ग्रामीण भागात एकूण 115 अंगणवाडी केंद्र कार्यरत असून या अंगणवाडी केंद्रातील 28 अंगणवाडी केंद्रात अजूनही सेविका व मदतनीस पद रिक्त असून बहुतांश अंगणवाड्यात वीज पुरवठा नसून पिण्याच्या पाण्याची सोय नाही अशा विविध समस्येवर तोडगा काढत एकात्मिक बाल विकास विभाग सुरळीत आणण्याच्या मुख्य उद्देशाने आज कामठी पंचायत समिती च्या सभागृहात नागपूर जिल्हा परिषदच्या महिला व बाल कल्याण सभापती प्रा अवंतिका लेकुरवाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत अंगणवाडी केंद्रांना पुरविण्यात येणारा निकृष्ठ आहार तसेच 90 टक्के अंगनवाड्यात बंद पडलेले सोलर व टीव्ही संच चा मुद्दा चांगलाच गाजला यावर सभापती प्रा अवंतिका लेकुरवाडे यांनी प्रकल्प अधिकारी सह संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर घेत भेसळ आहार पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारासह ,टीव्ही व सोलर चा निकृष्ट साहित्य पुरवठा केलेल्या कंत्राटदारांचे कंत्राट रद्द करून कायदेशीर कारवाही करण्याचे आदेश दिले. तब्बल सकाळी 11 ते दुपारी साडे तीन वाजेपर्यंत चाललेल्या या आढावा बैठकीत उपस्थित अंगणवाडी सेविका व मदतनीसानी प्रशासकीय सहकार्या अभावी अंगणवाडी केंद्रात असलेल्या विविध समस्येचा बिनधास्तपणे पाढा वाचला.ज्यामुळे आजची ही आढावा सभा चांगलीच गाजली.तर सभेत सॅम मॅम, अंगणवाडी इमारत,इमारत दुरुस्ती,शौचालय दुरुस्ती,विद्दुत पुरवठा,पाणी व्यवस्था,गॅस सिलेंडर,आहार वाटप,अंगणवाडी दुरुस्ती आदी विषयावर आढावा घेण्यात आला.

याप्रसंगी सभेत कामठी पंचायत समिती सभापती दिशा चनकापुरे,उपसभापती दिलीप वंजारी,पंचायत समिती सदस्य आशिष मललेवार,सूमेध रंगारी,सोनू कुथे ,इतर पंचायत समिती सदस्यगन,जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ कंभाले,दिनेश ढोले,मोहन माकडे,जिल्हा कार्यक्रम अधिकारी भागवत तांबे,गट विकास अधिकारी अंशुजा गराटे, सहाय्यक गट विकास अधिकारी प्रदीप गायगोले आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागात असलेल्या अंगणवाडी केंद्राचे अर्धवट बांधकाम हे लवकरात लवकर पूर्णत्वास आणून शौचालय बांधकाम करणे वर चर्चा करण्यात आली तसेच सॅम मॅम बालक ज्या ठिकाणी आढळून आले त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांनी व्यक्तिक भेट देणे ,ज्या अंगणवाडी केंद्रात गॅस सिलेंडर नाही त्या अंगणवाडिला गॅस पुरवठा करणे,पाण्याची सोय करणे आदींच्या सूचना करण्यात आल्या.दरम्यान काही अंगणवाडी सेविकांनी सांगितल्या नुसार अंगणवाडी केंद्रांना पुरविण्यात येणाऱ्या आहारातील मुंग डाळ, तिखट आणि मीठ मध्ये भेसळ असून मिठात दगड येतात तसेच मिर्ची पावडर हे पूर्णतः भेसळ आहे असा भेसळ आहार पुरविणाऱ्या कंत्राटदार दारावर कारवाही करण्याचे आदेशीत करण्यात आले.व दर्जेदार आहार पुरविण्याचे सांगण्यात आले.अंगणवाडयाना निकृष्ट दर्जाचे पूरविण्यात आलेले सोलर व टीव्ही संच हे बंद पडलेले आहेत तेव्हा अशा निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरवठा करणाऱ्या कंत्राट दारावर कारवाही करण्याचे सभेत सांगण्यात आले त्याचप्रमाणे कार्यरत अंगणवाडी सेविका ही महसूल गावची नसल्यास व तसे आढळल्यास त्या अंगणवाडी सेविकेवर कारवाही करण्याचे निर्देश प्रा अवंतिका लेकुरवाडे यांनी दिले तसेच 03 ते 6 वर्षे वयोगटातील अंगणवाडी मध्ये पटावर असणाऱ्या बालकांना खेळीमेळी च्या वातावरणात शिकविण्यात यावे व अंगणवाडी ची पटसंख्या वाढविण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी तालुक्यात तीन दिवसीय प्रशिक्षण व अभ्यास दौरा

Mon Feb 13 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- यशवंतराव चव्हाण विकास प्रकाशन प्रबोधिनी यशदा पुणे यांच्यावतीने नुकत्याच निवडणुका पार पाडून पदभार सांभाळणाऱ्या नवनियुक्त ग्रा प सरपंच,उपसरपंच व ग्रा प सदस्य यांचे 9 ते 11 फेब्रुवारी या तीन दिवसीय क्रांती ज्योती प्रशिक्षण कामठी पंचायत समिती सभागृहात घेण्यात आले. या दरम्यान ग्राम स्वराज्य अभियान पंचायत राज प्रशिक्षण केंद्र नागपूर यांचा आदर्श ग्राम पदाधिकारी क्षेत्रीय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com