बीड येथील घटना गंभीर; प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर :- बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील घटना गंभीर असून यास सरकारने गांभीर्याने घेतले आहे. संबंधीत आरोपी व दोषी पोलीसांवर कारवाई करण्यात आली असून या प्रकरणातील आणखी कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी 289 अन्वये उपस्थित केलेल्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येविषयीच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या घटनेसाठी ‘सीआयडी’ची एक विशेष एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. तांत्रिक व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून फरार आरोपींना लवकरच पकडण्यात येईल. या प्रकरणात एका पोलीस अधिकाऱ्यांस सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले असून एकास निलंबित करण्यात आले आहे. आरोपी कोणत्याही जाती, धर्माचा किंवा राजकीय पक्षाचा असला तरी तसेच कोणत्याही दबावाचा विचार न करता यासंदर्भात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

तालिका सभापतींच्या नावांची घोषणा

Mon Dec 16 , 2024
नागपूर :- विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेच्या तालिका सभापतीपदी नियुक्त नावे जाहीर केली. तालिका सभापती पदी सर्वश्री निरंजन डावखरे, शिवाजीराव गर्जे, कृपाल तुमाने, सुनील शिंदे, धीरज लिंगाडे यांच्या नावाची घोषणा गोऱ्हे यांनी केली. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!