नागपूर :- जलसंपदा विभाग, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ व भारतीय जलसंसाधन संस्था, माहीती विभाग, शिक्षण विभाग, ज्ञानदीप व बानाई नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित जलजागृती सप्ताह १६ ते २२ मध्ये आज जलपूजन, जलशपथ घेत जल जागृती सप्ताहाी सुरवात आज झाली. सुट्टीचा दिवस असूनही उत्साह दिसून आला.
सिंचन भवन येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेश सोनटक्के होते. जल अभ्यासक, अध्यक्ष भारतीय जलसंसाधन संस्था, डॉ. शंकरराव चव्हाण राज्यस्तरीय जलभूषण पुरस्कार प्राप्तकर्ते डॉ. प्रवीण महाजन, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डॉ. प्रकाश पवार, भारतीय जलसंसाधन संस्थेच्या केंद्राचे सचिव राजेश ढुमणे, संजय वानखेडे, किशोर वरंभे, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता नंदकिशोर दळवी पाटील, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे प्रशासक व अधीक्षक अभियंता सोनाली चोपडे. गोसीखुर्दचे अधीक्षक अभियंता राजेश पाटील, कार्यकारी अभियंता रोषण हटवार, राजेश सोनोने, गजानन बोकडे, केतन आकुलवार, प्रमोद वाकोडे, महेंद्र कारेमोरे, अनिता पराते, जयश्री थोटे, प्रांजली टोंगसे आदी यावेळी उपस्थित होते.
विविध शासकीय, अशासकीय विभागांच्या समन्वयातून जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असते. जन सामान्यांपर्यंत जल बचतीचे महत्व, फायदे शाळा शाळा पासून तर पाणी वापर संस्था व सदस्य शेतकरी यांचे साठी आवश्यक आहे. आपण घेत असलेल्या बिगर सिंचन पाणी वापर संस्था व सिंचन पाणी वापर संस्थाचे चर्चासत्र घेतल्याने वर्षेभर हा कार्यक्रम चालू राहील. याचा फायदा शेतकऱ्यांना होईल असा विश्वास सोनटक्के यांनी व्यक्त केला. पाणी पट्टी वसूलीचे उद्दिष्ट पार पडले असले तरी बाकी पाणी वसूली साठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. या वसूलीचा फायदा आपले जलाशय व कालवे यासाठी केला जात असल्याने यावर सर्वानी काम करावे.
जलजागृती ही कागदावर न होता शहरात, गावात व बांधा पर्यंत पोहचली पाहीजे. त्यासाठी प्रत्येकाने जलजागृतीचे कार्य केले तर हा दिवस दूर नाही. दर महीन्यातून एक दिवस पाणी विषयावर चर्चासत्र किवा सेमिनार घेवून या कार्याला पुढे नेवू. बैंगलोर येथील पाणी समस्यांबाबत माहीती देत होत असलेल्या स्थलांतरावर बाबत चिंता व्यक्त करीत पाण्याचा थेंब थेंब वाचवावा असे अव्हान केले. जलजागृतीच्या अनेक छोट्या मोठ्या पैलूवर त्यांनी प्रकाश टाकत जलजागृती सप्ताहाचे कार्यक्रम याबाबत सविस्तर माहिती दिली. सर्व कार्यक्रमासाठी सहभाग नोंदवावा असे आव्हान भारतीय जलसंसाधन संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण महाजन यांनी केले. याप्रसंगी पाणी बचाव ही राष्टीय घोषणा शासनानी मान्य करावी अशी सूचना केली. त्याकरीता आचारसंहिता नंतर मुख्यमंत्री व पंतप्रधान यांना पत्र लिहून ही मागणी करण्यात येईल असेही ते म्हाणाले.
शासनाच्या सूचना नुसार आपण हा सप्ताह साजरा करत असतो. या सप्ताहात जलप्रदूषणाचे महत्व महानगरपालिका, नगरपालिका, ग्राम पंचायत यांचे भागात होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. आपले जलाशय आज जलप्रदूषणाचे विळख्यात सापडलेले आहे. जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. यामुळे या जलाशयाचा पाणी वापर पूर्ण करता येत नाही याकरिता या सप्ताहात प्रयत्न व्हायला पाहिजेत. भविष्यात जलजागृती सोबत जलप्रदूषणाचे कार्य करून जलाशय वाचवावे असे आव्हान केले. जलस्त्रोतांचे प्रदूषण रोखणे भविष्यातील मोठे आव्हान असून त्यावर मात करण्यासाठी लोकांमध्ये जलजागृती होणे आवश्यक असल्याचे मुख्य अभियंता पवार यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे नागपूर जिल्ह्यातील 400 शाळा मधून जल जागृती सप्ताहाच्या निमित्ताने जल प्रतिज्ञा घेण्यात आली असून जवळपास जल प्रतिज्ञा घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही तीन लाखाच्या जवळपास पोचली आहे या जल प्रतिज्ञा लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत पाण्याचे महत्व घराघरात पोहोचले.
जलसप्ताहाच्या निमित्ताने विदर्भातील 13 प्रमुख नद्यांच्या पाण्याचा कलश सिंचन भवन येथे आणण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते जलपूजनाने जल सप्ताहाचे उद्घाटन झाले. उपस्थितांनी पाण्याचा वापर व संवर्धन करण्याबाबत जल प्रतिज्ञा घेतली. 22 मार्चपर्यंत विविध उपक्रमांतून पाण्याच्या वापराबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.