– कोंढाळी तरोडा मार्गावरील श्री संत गजानन महाराज नगरी चे भव्य प्रांगणात सोहळ्याचे आयोजन
कोंढाळी :-जीवन आधार बहुउद्देशीय सामाजिक संस्था नागपूर ,श्री संत गजानन महाराज उत्सव समीती, श्री संत गजानन महाराज नगरी कोंढाळी चे संयुक्त विद्यमाने श्री संत गजानन महाराज प्रकट दिन 2025 निमित्त 19 व 20 फेब्रुवारी दरम्यान श्री संत गजानन महाराज व श्री संत साईबाबा व आई तुळजाभवानी यांच्या मुर्तींची आणि श्री संत गजानन महाराजांच्या पादुकेची प्राण प्रतिष्ठा सोहळ्या चे कोंढाळी येथील कोंढाळी तरोडा मार्गावर नवनिर्माणाधिन श्री संत गजानन महाराज नगरी कोंढाळी येथील भव्य प्रांगणात भव्य दिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रीसंत गजानन महाराज, श्री संत साईबाबा ,व आई तुळजाभवानी यांच्या मुर्तीं व पादुकाची प्राणप्रतिष्ठा सोहळ्या अंतर्गत 19 फेबु्रवारी बुधवार ला सकाळी 08 ते 10 भव्य पालखी सोहळा सकाळी 10 ते दुपारी 02 वाजता श्रींच्या मुर्तींची धर्मशास्त्रानुसार विधीवत संपुर्ण सौपस्कार होऊन मुहूर्तावर श्रींच्या मुर्ती प्राणप्रातिष्ठेसोबतच श्री साईबाबा व आई तुळजाभवानी ची प्राण प्रतिष्ठा व श्री च्या पादुकांची प्राणप्रतिष्ठा, सोहळा नागपूर /कोंढाळी सह लगतचे गावातील हजारो भाविकांच्या उपस्थितीत टाळमुदंगाच्या गजरात, भक्त, मंडळीच्या जयघोषात व ब्रम्हवृंदांच्या मंत्रोपचारात सानंद संपन्न होणार आहे.दुपारी 04 ते सायंकाळी 06 वाजेपर्यंत आई तुळजाभवानी भवानी चां गोंधळाचे आयोजन, सायंकाळी 07 ते 08 वाजे पर्यंत वंदनिय राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांची सामुहिक प्रार्थना.त्याच प्रमाणे गुरूवार 20 फेब्रुवारी श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त सकाळी 06 ते 07 अभिषेक पूजा, दुपारी 12-ते आगमनापर्यंत महाप्रसाद तर सायंकाळी 05वाजता सुमधूर -संगीतमय भक्ती गीतां चे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
अशी माहिती श्री संत गजानन महाराज नगरी व जीवन आधार बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे पदाधिकार्यांनी दिली आहे.