विसर्जन स्थळाच्या क्षमतेनुसार मूर्तींची उंची असावी – मूर्तिकार व गणेश मंडळांना मनपाचे आवाहन

– ग्राहकांनी मूर्तिकारांकडून मातीच्या मूर्तीची प्रमाणित पावती घ्यावी

– पीओपी मूर्तींवर असणार मनपाचा वॉच

चंद्रपूर  :- मागील वर्षीपासून पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने रामाळा तलाव येथे विसर्जन करणे बंद करून ईरई नदी काठावर विसर्जन उपलब्ध करून देण्यात आले आहे. या स्थळी पाण्याची खोली ही ६ ते ८ फूट पर्यंत मिळु शकते त्यामुळे मूर्तिकार व गणेश मंडळांनी विसर्जन स्थळाच्या क्षमतेनुसारच गणेश मुर्तींची उंची राखण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेने केले आहे.

चंद्रपूर शहरातील गणेशोत्सव पूर्वतयारीसाठी विविध विभागाचे अधिकारी आणि मूर्तिकार यांची बैठक मनपा सभागृहात २८ जुलै रोजी आयोजीत करण्यात आली होती. यावेळी आयुक्त विपीन पालिवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले,उपायुक्त अशोक गराटे, पोलीस निरीक्षक सतीशसिंह राजपूत,सुजीत बंडीवार, सहायक आयुक्त नरेंद्र बोभाटे, राहुल पंचबुद्धे, डॉ.वनिता गर्गेलवार,डॉ. अमोल शेळके,नितीन रामटेके,प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रतिनिधी यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी आणि मूर्तिकार प्रतिनिधींची उपस्थिती होती.

चंद्रपूर शहरात नागरिकांच्या सहकार्याने पीओपी मूर्तीं बनविणे, त्यांचा वापर व विक्री पूर्णतः बंद आहे व १०० टक्के पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा केला जातो. तरीही यावर्षीसुद्धा झोननिहाय पथकांद्वारे प्रत्यक्ष आणि गुप्त पद्धतीने मूर्तींची तपासणी केली जाणार आहे. मूर्तिकार व मातीच्या मूर्ती विक्री करणारे मूर्तिविक्रेते दोघांनाही मनपाकडे नोंदणी बंधनकारक आहे,नोंदणी न करता मूर्ती विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे. नोंदणी आपापल्या परिसरातील झोन कार्यालयात करायची असुन पीओपी मूर्तीची विक्री, आयात आणि निर्मिती करताना आढळल्यास दंडात्मक कारवाईसह गुन्हा दाखल होणार आहे.

मूर्तीची खरेदी करताना ती मातीचीच असल्याची प्रमाणित पावती ग्राहकांनी घ्यावी आणि ती मूर्तिकारांनी आपल्या स्वाक्षरीनिशी संपर्क क्रमांकासह द्यावी,कृत्रिम कलश,रथ, निर्माल्य कलश यांची व्यवस्था राहणार असुन शासनस्तरावर पर्यावरणपुरक गणेशोस्तव स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. यात सहभागी होऊन सर्वांनीच गणेशोत्सव आनंदाने साजरा करण्याचे आवाहन आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बैक बेंचर ही देश के असली भविष्य निर्माता

Mon Jul 31 , 2023
– उप मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस के जन्मदिन के निमित्त बोर्ड परिक्षा पास विद्यार्थीयों का “पॅलिटिकल प्रचार सत्कार” संपन्न,महालक्ष्मी मंदिर में हुआ राजनैतिक कार्यक्रम,धर्म और राजनीति का अनोखा संगम नागपुर :- दक्षिण-पश्चिम नागपुर विधानसभा क्षेत्र के विधायक और राज्य के उप मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस के जन्मदिन के अवसर पर दसवीं बारहवीं कक्षा ( 35% से लेकर मेरिट विद्यार्थियों तक ) पास […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com