संदीप बलविर, प्रतिनिधी
– रस्ता बांधकामात कंत्राटदाराचा मनमानी कारभार
– सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष
– बोरखेडी (रेल्वे) ते आलागोंदी आष्टा प्रधानमंत्री सडक योजना
नागपूर :- देशातील प्रत्येक गाव हे शहराशी जोडले जावे म्हणून देशात प्रधानमंत्री सडक योजना राबविली गेली.त्यामुळे देशातील दुर्गम आणि शहराला जोडण्यासाठी ग्रामीण भागात रस्त्याचे काम सुरू केल्याचे दृश्य सध्या पूर्ण महाराष्ट्रभर दिसून येते.याच धर्तीवर सद्यस्थितीत नागपूर ग्रामीम तालुक्यातील बोरखेडी (रेल्वे) ते आलगोंदी ते टेम्भरी ते खर्डा ते तामसवाडी ते रामा या गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे काम प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत गत ५ महिन्यापासून सुरू आहे.सदर १४.३० किमी च्या रस्त्याचे काम फोनिक्स इंजिनिरिंग स्ट्रक्चरल अँड मेकॅनिकल इंजिनिरिंग अँड कॉन्स्ट्रक्शन कंपनीला ६२६.३८ लक्ष रुपयाला दिले आहे.मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे व कंत्राटदाराच्या मनमाणीमुळे सबब काम संथगतीने सुरू असल्याने पादचारी, वाहतूकदार,शालेय विद्यार्थी व रस्त्याच्या कडेला असलेल्या वसाहती वाल्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
गत पाच महिन्यापासून सुरू असलेल्या रोड चे कामामुळे कंत्राटदाराने जुना डांबर रोड खोदून त्यावर मुरूम टाकला आहे.परंतु त्यामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले असून येथून शाळेत जाणारे विद्यार्थी,पादचारी,दुचाकी चालकांची खूप मोठी गैरसोय होत आहे.येथील रहिवासी क्षेत्रात मार्गावरील जड वाहनांच्या वाहतुकीने निर्माण होणाऱ्या धुळीच्या साम्राज्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली असून नागरिकांच्या आरोग्यावर देखील घातक परिणाम होत असल्याच्या अनेक तक्रारी नागपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती व पंचायत समिती सदस्य संजय चिकटे यांनी वारंवार करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे कामचुकार अधिकारी लक्ष देण्यास टाळाटाळ करीत आहे.
कोणतेही काम करायचे झाल्यास गैरसोय होतेच.परंतु,त्यावर उपाय योजना करून गैरसोय टाळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असते.मात्र या रस्त्याच्या बांधकामात प्रयत्नांचा अभाव दिसून येत असून बोरखेडी (रेल्वे) मुख्य चौक ते खापर्डे शाळा येथील १ किमी रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे.डागडुगी च्या नावावर त्यावर मुरूम टाकण्यात आला असून या मुरूमवरूनच वाहतूक सुरू आहे.जेव्हा मोठी वाहने धावतात,तेव्हा प्रचंड धूळ उडून समोरचे वाहन काही काळासाठी दिसेनासे होत असते.मोठे वाहन आल्यास दुचाकी बाजूला उभी करायची तर रस्त्या कडेला मोठं मोठे गिट्टीचे ढिगारे टाकली आहे.त्यामुळे छोट्या मोठ्या दुर्घटना नित्याच्याच झाल्या असून या सर्व बाबीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारीच जवाबदार असल्याचे संजय चिकटे यांचे म्हणणे आहे.जर या रस्त्याचे काम १५ दिवसात केले नाही तर नागपूर पंचायत समिती माजी उपसभापती व प स सदस्य संजय चीकटे हे शेकडो ग्रामस्थांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे सांगितले.