अधिकाऱ्यांच्या तत्परता व सहृदयतेने मुलीचा एमबीबीएसचा प्रवेश सुकर

एका दिवसात दिले जातपडताळणी प्रमाणपत्र

नागपूर :- प्रशासनातील अधिकाऱ्याने मनावर घेतल्यानंतर सामान्यांची अडलेली कामे तातडीने होऊ शकते, असा सुखद अनुभव जिल्हा जात पडताळणी अधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यांच्या पुढाकारामुळे शेवटच्या दिवशी मुलीची एमबीबीएसची अँडमिशन झाली आहे.

नागपूर येथील जात वैधता प्रमाणपत्र अधिकारी सुरेंद्र पवार यांनी यासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. वर्धा येथील मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी शेवटच्या दिवशी जात पडताळणीची अडचण आली. त्यामुळे इन्शारा जावेद नदीम या मुस्लीम ओबीसी मुलीच्या एमबीबीएस प्रवेशासाठी अडचण निर्माण झाली. मात्र घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरेंद्र पवार यांनी जात पडताळणी समितीचे अध्यक्ष सचिन कलंत्रे यांचे मार्गदर्शन घेतले. त्यांनी तातडीने मदत करण्याचे निर्देश दिल्यावर आपले सहकारी संशोधन अधिकारी आशा कव्हाळे यांच्या मदतीने काही तासातच अर्ज घेऊन जात पडताळणी प्रमाणपत्र तयार केले.

इन्शाराचा प्रवेश जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्यामुळे अडला होता. तिच्या प्रवेशाचा शेवटचा दिवस होता. मात्र त्याच दिवशी अर्ज घेऊन त्याच दिवशी 24 तासाच्या आत अर्ज निकाली काढण्याचे कार्य सुरेंद्र पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. मुलीला एकाच दिवसात प्रमाणपत्र मिळाल्याने तिचा प्रवेश सुकर झाला आहे.अल्पसंख्यांक समुदायातील एका मुलीला उच्च शिक्षणात आलेला अडसर दूर करण्याचे दायित्व घेतल्याबद्दल सुरेंद्र पवार व त्यांच्या चमूचे कौतुक केले जात आहे.

जात पडताळणीची प्रक्रिया अतिशय सुलभ असून विद्यार्थ्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत विनाकारण पडताळणी प्रलंबित ठेवू नये. तातडीने पडताळणी करून घ्यावी अशी आवाहनही त्यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भारतीय जनता पार्टी प्रदेश ओबीसी मोर्चा तर्फे सारंग गोडबोले यांची शहर संयोजक व उमाशंकर नामदेव यांची सहसंयोजक या पदावर नियुक्ती 

Sat Nov 5 , 2022
नागपूर :- भारतीय जनता पार्टी प्रदेश ओबीसी मोर्चा तर्फे ,धन्यवाद मोदी अभियान, यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे नागपूर शहर संपर्क मंत्री सारंग गोडबोले यांची शहर संयोजक व ओबीसी मोर्चा नागपूर शहरचे प्रसिध्दी प्रमुख उमाशंकर नामदेव यांची श्हर सहसंयोजक या पदावर नियुक्ती करण्यात आली नवनियुक्त पदाधिका-यांनी भाजपा ओबीसी मोर्चाचे सर्व प्रदेश पदाधिका-यांचे, शहर पदाधिका-यांचे आभार मानले. त्या प्रत्यर्थ भाजपा ओबीसी र्मोचा नागपूरचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!