– जीवनविकास शिक्षण संस्था कर्मचारी पतसंस्थेच्या आमसभेत सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार
नागपूर :- जीवनविकास एज्युकेशन सोसायटी सेवकांची सहकारी पतसंस्था, आयुर्वेदिक लेआऊट, उमरेड रोड,नागपूर या संस्थेची सन 2020- 2023 ची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, दि. 30 सप्टेंबर 2023 ला, बाबुराव झाडे नवप्रतिभा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेचे अधक्ष प्रवीण झाडे यांचे अधक्षतेखाली संपन्न झाली. सभेला माझी अधक्ष व शिक्षक भारतीचे राज्य उपाधक्ष राजेन्द्र झाडे, तसेच सर्वश्री वसंतराव झाडे, नितीन झाडे, देवेंद्र काळबांडे, अरविंद बांगडे, अनिता उईकें, मोहिनी साठवणे, धनश्री झाडे, सुदीप राचलवर, सुनील वाघमारे, किशोर काळे व अनेक सभासद हजर होते.
या सभेत प्रामुख्याने संस्थेचे वार्षिक आर्थिक पत्रके, अहवाल, अंदाजपत्रक, व लाभांश वाटपावर सविस्तर चर्चा होऊन सभासदांना त्यांचे शेअर्ष भांडवलावर सात टक्के लाभांश मंजूर करण्यात आला. सेवानिवृत मुख्याध्यापक, माधुरी झाडे, विलास मस्के, रसिका देशपांडे, नलिनी फिस्के, शिला नागदिवे, शिक्षक गिरीश चौधरी, शिपाई श्रावण बावणे याचा मान्यवरांचे हस्ते शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर या वर्षात लग्न झालेले सभासदांचे मुले सर्वश्री संकेत बळवंत मोरघडे, डॉ. देवयानी राजेन्द्र झाडे, श्रुतिका प्रभाकर फिसके या वर वधुंना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
मार्च 23 चे 10 व 12 चे परीक्षेत ज्या सभासदांचे पाल्याना 75 टक्के पेक्षा जास्त गुण असेल त्या विद्यार्थि चां रोख बक्षीस, व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. सभेचे निमंत्रक व मानद सचिव बळवंत मोरघडे यांनी सभेचे संचालन तर आभार उपाध्यक्ष देवेंद्र काळबांडे यांनी मानले.