दीक्षाभूमीवरील अनुयायांनी घेतला मनपाच्या निवाऱ्यात आसरा 

मनपाच्या सोयी सुविधांमुळे अनुयायांना दिलासा : ६६वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा संपन्न

नागपूर :- उपराजधानीत ६६व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने अनुयायी दीक्षाभूमीवर दर्शनासाठी आले असताना दुपारनंतर पावसाने अचानक जोरदार हजेरी लावली. पावसामुळे निर्माण झालेल्या स्थितीत मनपा आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार आधीच नागरिकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या निवारा केंद्रांवर अनुयायांना आसरा घेता आला. दीक्षाभूमी आणि परिसरात मनपाद्वारे पुरविण्यात आलेल्या सोयी सुविधांमुळे अनुयायांना दिलासा मिळाला.बुधवार (ता. ५ ऑक्टोबर) रोजी दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा साजरा करण्यात आला. याकरिता देशभरातून लाखो अनुयायी दीक्षाभूमीवर दर्शनासाठी आले होते. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनुयायांच्या सुविधेच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेतर्फे सर्व व्यवस्था करण्यात आलेली होती. मनपा नियंत्रण कक्षासह पावसामुळे निर्माण होणाऱ्या कुठल्याही परिस्थितीसाठी मनपा प्रशासन पूर्णतः सज्ज होते. दुपारनंतर अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे अनुयायांची तारांबळ उडाली.

पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेत मनपा नियंत्रण कक्षातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निवारा केंद्रांची लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात स्थित नियंत्रण कक्षामधून माहिती लाऊडस्पिकर द्वारे नागरिकांना तात्काळ दिली. दीक्षाभूमी परिसरातील आरोग्य उपसंचालक कार्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, समाजकल्याण कार्यालय, शासकीय चित्रकला महाविद्यालय, आर. एस. मुंडले हायस्कूल, परांजपे शाळा, धरमपेठ हायस्कूल, सरस्वती हायस्कूल शंकरनगर यासह मनपाच्या सुभाष नगर आणि वाल्मिकी नगर अश्याप्रकारे मनपाच्या दहा शाळेमध्ये नागरिकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. याठिकाणी मनपाद्वारे विद्युत दिव्याची व्यवस्था करण्यात आल्यामुळे अनुयायांना मोठा दिलासा मिळाला. विद्युत दिवे आणि मोबाईल चार्जिंगची व्यवस्था असल्यामुळे बाहेरून आलेल्या अनुयायांनी समाधान व्यक्त केले. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात उपायुक्त (महसूल) व दीक्षाभूमी व्यवस्थेचे नोडल अधिकारी मिलिंद मेश्राम यांच्या नेतृत्वात सर्व कार्यकारी अभियंता, शिक्षणाधिकारी, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) डॉ.गजेन्द्र महल्ले, सहायक आयुक्त किरण बगडे, सर्वश्री गणेश राठोड, अशोक पाटील, प्रकाश वराडे, घनश्याम पंधरे यांच्या सूचनेनुसार विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांनी समन्वयाने कार्य करून नागरिकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी कार्य केले.

मनपाचे स्वच्छता कर्मचारी २४ तास कार्यरत

दीक्षाभूमी परिसराच्या स्वच्छतेसाठी मनपातील स्वच्छता कर्मचारी २४ तास कार्यरत होते. दीक्षाभूमी परिसराच्या चारही बाजूच्या रस्त्यांची साफसफाई करण्यात यावी याकरिता मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे प्रत्येक पाळीत २० कर्मचारी तैनात करण्यात आले होते. रस्त्यावर पडलेला कचरा, साफसफाईतील कचरा साठविण्यासाठी चारही रस्त्यावर २०० हुन अधिक ड्रम तयार करण्यात आले होते. या ड्रम मधील कचरा २० लहान वाहनांच्या सहाय्याने दोन मोठ्या कॉम्पॅक्टरमध्ये घेवून भांडेवाडी डपिंगयार्डमध्ये पोहोचविण्यात आला. तसेच अनुयायांसाठी महानगरपालिकेद्वारे ९०० शौचालयाची व्यवस्था करण्यात आली होती. तर नीरी रोड, काछीपुरा चौक, रहाटे कॉलनी चौक, लक्ष्मीनगर चौक मोबाईल टॉयलेट तयार करण्यात आले होते. याशिवाय परिसरात सी.सी.टीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. रात्री अनुयायांना असुविधा होऊ नये याकरिता रस्त्यावरील पथदिवे सुरू ठेवण्यात आले होते. तसेच आवश्यक ठिकाणी प्रकाश व्यवस्था करण्यात आली होती. दिक्षाभूमीच्या सभोवतालच्या परिसरात जागोजागी व नागपूर शहरात सुध्दा जागोजागी दिक्षाभूमीकडे जाणा-या दिक्षाभूमीकडून इतर ठिकाणी जाणारे रस्ते, कोणती मुलभुत सुविधा कोणत्या ठिकाणी आहे याबाबत दिशादर्शक व स्थळ दर्शक नकाशे प्रदर्शित करुन अनुयायांना स्थळे सुलभरित्या प्राप्त होणे विषयी सुविधा पुरविण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची कारवाई

Fri Oct 7 , 2022
नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता.6) 03 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 15 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ, सतरंजीपूरा आणि लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 15,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 9 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com