संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 1 :- विदर्भ महिला केसरी स्पर्धेत प्रथम विदर्भ केसरी महिला पहिलवाणाचा बहुमान नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील पावंनगाव रहिवासी आकांक्षा अनिल चौधरी चा पावनगाव ग्रामपंचायत तसेच गावकऱ्यांच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला.
वर्धा खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत वर्धा जिल्ह्याच्या वरुड तालुक्यातील शेंदूरजना घाट येथील वीर बाजीप्रभू बहुउद्देशीय क्रीडा मंडळ, अमरावती जिल्हा कुस्तीगीर संघ च्या वतीने आयोजित पहिली विदर्भ महिला केसरी स्पर्धेमध्ये प्रथमविदर्भ केसरी महिला पहिलवानाचा मान कोण पटकावणारअशी उत्सुकता लागून राहिली होती. अंतिम सामन्यात नागपूरच्या कामठी तालुक्यातील पावंनगाव गावातील आकांक्षा चौधरीने बुलडाण्याच्या श्रावणी माेटेला चित करीत २५ गुणांसह विदर्भाची प्रथम महिला विदर्भ केसरी हा बहुमान पटकावला. व कामठी तालुक्यातील पावंनगाव गावाचे नाव उंचावल्याबद्दल आकांक्षा चौधरीचा आज सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख पाहुने म्हणून भाजप नागपुर जिल्हा) महामंत्री व माजी जी प सदस्य अनिल निधान,राजेशजी लोया RSS( महानगर सरसंघचालक ) ,रामा येंगड (कोच) रोशन महाने , आरएसएस महानगर शारीरिक प्रमुख गोवर्धन वठी कोच , अनिल आमदने, कोच रविंद्र हज़ारे, कोच संतोष राठौड़, कोच अनिल नागोरावजी चौधरी , सुनीता अनिलजी चौधरी, सरपंच नेहा किरण राऊत , उपसरपंच रामचन्द्रजी रेवाडे, ग्रामपंचायत सदस्य किरण धनराज राऊत,सविताताई संजयजी काळे , राहुलजी मूलचंद उईके, ग्राम सदस्य समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.