Ø विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर
नागपूर :- मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून छायाचित्र मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर झाला आहे. यानुसार 20 ऑगष्ट ऐवजी 27 ऑगस्ट 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.
सुधारित कायक्रमानुसार 2 ते 16 ऑगस्ट 2024 या कालावधीत नागरिकांकडून दावे व हरकती मागविण्यात आल्या आहेत. यानुसार पात्र नागरिकांनी नवीन मतदार नोंदणी, दुरुस्ती, वगळणी यासाठी विहीत नमुन्यात अर्ज करण्याचे व जास्तीत-जास्त मतदारांनी मतदार नोंदणी करण्याचे आवाहन मतदार यादी निरिक्षक तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे. प्राप्त दावे व हरकतींचे 26 ऑगष्ट 2024 पर्यंत निराकरण करण्यात येणार आहे.