नवी दिल्ली :- केंद्रीय निवडणूक आयोगाच्या 20.5.2024 च्या दोन प्रसिद्धी पत्रकांमधील माहितीला अनुसरून सध्या सुरू असलेल्या 2024च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यात लोकसभेच्या 49 मतदारसंघांमध्ये 62.2 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. या मतदानाची लिंगनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहेः
2. राज्यनिहाय आणि लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची आकडेवारी अनुक्रमे तक्ता 1 आणि 2 मध्ये देण्यात आली आहे. असे नमूद करण्यात येत आहे की ओदिशामधील 13-कंधमाल लोकसभा मतदारसंघातील दोन मतदान केंद्रांवर आज फेरमतदान होईल आणि या फेरमतदानाची आकडेवारी समाविष्ट करून मतदानाची आकडेवारी पुन्हा अद्ययावत करण्यात येईल, जी मतदार प्रतिसाद ऍपवर पाहता येईल. “इतर मतदार” या श्रेणीत जागा मोकळी असल्यास त्यामध्ये कोणत्याही नोंदणीकृत मतदाराचा समावेश नाही, असे सूचित होते. एखाद्या मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदान केंद्रावर उमेदवारांना त्यांच्या मतदान प्रतिनिधींमार्फत फॉर्म 17सी ची प्रत देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांसोबत यापूर्वीच सामाईक करण्यात आलेल्या फॉर्म 17 सी मधील प्रत्यक्ष माहिती लागू राहील. टपालाद्वारे केलेल्या मतदानाची मोजणी झाल्यानंतरच आणि तिचा समावेश एकूण मतदानामध्ये केल्यानंतरच अंतिम आकडेवारी उपलब्ध होईल. संरक्षण सेवांमधील मतदार, उपस्थितीतून सूट मिळालेले मतदार( 85+, दिव्यांग, अत्यावश्यक सेवा इ. मधील) आणि निवडणुकीच्या कर्तव्यावरील मतदार यांना दिलेल्या टपाल मतपत्रिकांचा समावेश टपाली मतदानात होतो. वैधानिक तरतुदींनुसार अशा टपाली मतदानाची रोजची आकडेवारी सर्व उमेदवारांना देण्यात येते.
3. त्याव्यतिरिक्त 25 मे 2024 रोजी मतदान होणाऱ्या 58 लोकसभा मतदारसंघांमधील नोंदणीकृत मतदारांचा तपशील तक्ता 3 मध्ये देण्यात आला आहे.