संदीप कांबळे विशेष म्हणजे
कामठी ता प्र 15 – लोकाधिकार परिषदेचे अध्यक्ष किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब यांची दिनांक 14 सप्टेंबर 2022 ला नागपूर येथील पत्रकार भवन मध्ये पत्र परिषद संपन्न झाली. पत्र परिषदेला संबोधित करताना भाऊसाहेब म्हणाले मैत्रेय उद्योग समूहाच्या चेअरमन वर्षा सत्पाळकर यांनी भारत देशातील 14 राज्यांमध्ये 125 कार्यालय उघडून 2 कोटी 16 लक्ष महिलांची फसवणूक केली व 2.5 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, व वेगवेगळ्या कोर्टामध्ये सुरू असलेल्या केसेस एकत्र आणून जलद गती कोर्टाच्या माध्यमाने न्याय प्रक्रिया चालवावी. तर मैत्री उद्योग समूहाची संपत्ती महाराष्ट्र शासनाने जप्त केली आहे. अर्थातच ही संपत्ती सध्याच्या स्थितीत मैत्री समूहाच्या चेअरमन वर्षा सतपालकर यांच्याकडे नसून महाराष्ट्र शासनाकडे आहे म्हणून महाराष्ट्र शासनानेच गुंतवणूकदार व प्रतिनिधींचे पैसे परत करावे. या मागणीला घेऊन येत्या 22 सप्टेंबर 2022 ला नागपूर येथील संविधान चौकामध्ये “आक्रोश धरणा आंदोलन” करण्याचे आयोजिले आहे. पुढे म्हणाले सन 2016 देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते, यांचे सरकार होते यांनी निश्चितच वर्षा सत्पाळकर यांना सहकार्य केले असावे. कारण नाशिक डिस्टिक कोर्टाने वर्षा सतपाडकर ग्रह क्षेत्राच्या बाहेर जाणार नाही व यांची संपत्ती शासनाने विकून लोकांचे पैसे परत करावे. या कंडिशनवर बेल दिली होती. मग वर्षा सकपाळकर आज कुठे आहेत असा सवालही भाऊसाहेबांनी केला? 2 कोटी 16 लक्ष महिलांची फसवणूक होते तरीही शासन प्रशासन हे अशा गुन्हेगारांना सहकार्य करते ही फार गंभीर बाब आहे. म्हणून लोकाधिकार परिषदेने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. मैत्री उद्योग समूहातील गुंतवणूकदार व प्रतिनिधी पैसे घरी मागायला लोक येतात म्हणून घरून बेपत्ता आहेत,नागपूर मध्ये 10 पेक्षा अधिक महिलांनी आत्महत्या केल्या, कित्येक नवऱ्यांनी आपल्या बायकांना माहेरी आणून सोडले घरी लोक पैसे मागायला येतात म्हणून, भारत देशातील 2 कोटी 16 लक्ष महिला कोणत्याही वाढदिवसात, लग्नात ,मरणात, किंवा सार्वजनिक कार्यात जाऊ शकत नाही. मैत्री ग्रुपच्या चेअरमन वर्षा सतपालकरला सहकार्य करणाऱ्यांनी याचा विचार करायला पाहिजे असेही भाऊसाहेब पत्र परिषदेमध्ये गंभीरपणे बोलले. पत्र परिषदेला लोकाधिकार परिषदेच्या सचिव माया ताई उके, सूर्यकांता घरडे, मौननाथ मेश्राम, ज्ञानेश्वर , लता तामसेटवार याप्रसंगी उपस्थित होत्या.