अतिक्रमणधारकांची विकासाला ‘ साथ ‘,नोटीस मिळताच काढले अतिक्रमण

– वॉटर फिल्टर पूर्णत्वासाठी सरपंचाचा पुढाकार

बेला :- सरकारी आबादी जागेवरील अतिक्रमण काढा म्हटले की, सहसा कोणी काढत नाही. अतिक्रमण हटवू नये. यासाठी ते राजकीय दबाव आणतात. शासनाचे विरुद्ध आंदोलन करतात. एवढेच नव्हे तर प्रसंगी कोर्टात जाऊन स्थगनादेश आणतात. असा एकंदरीत अनुभव आहे. मात्र,बेला येथील पोलीस ठाण्यासमोरील अतिक्रमणधारकांनी जलजीवन मिशनच्या जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी आपल्या अतिक्रमणाची अडचण येऊ नये.यासाठी स्वतःहून आपापले अतिक्रमण शेड हटवले. या मुद्द्यावरून गावात राजकारण सुरू असताना अतिक्रमणधारकांनी उदात्त मनाने घेतलेल्या भूमिकेचे परिसरात कौतुक होत आहे. अतिक्रमण काढण्यात आल्यामुळे जलशुद्धीकरण प्रकल्प लवकरच पूर्ण होईल व गावकऱ्यांना शुद्ध ,स्वच्छ पाणी पिण्यास मिळेल. असा आशावाद सदर कामासाठी पुढाकार घेणारे सरपंच अरुण बालपांडे यांनी व्यक्त केला.

सर्वे क्रमांक 436 वनमालकी हक्काची जागा होती. परंतु अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वनवासी अधिनियम 2006 कलम3(2) अंतर्गत त्यामधील 0.35 हे. जागा जल जीवन मिशन योजनेच्या बेला येथील जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी संपादित व हस्तांतरित झाली आहे. टाकीचे बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित खाली जमिनीवर जलशुद्धीकरण संयंत्र व बांधकाम करायचे आहे. त्यासाठी आसपासचे अतिक्रमण हटवणे गरजेचे झाले होते. म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने बेला ग्रामपंचायतला 10 मे 2023 ला प्लांटचे आसपासचे अतिक्रमण काढून द्यावे. असे पत्र दिले होते. त्यानुसार तेथील अतिक्रमणधारकांना ग्रामपंचायतीने नोटीस बजावल्या होत्या. नोटीस मिळताच महादेव झिले, बबलू पवार, विजय जेवळे व विकी नक्षणे यांनी आपले अतिक्रमण स्वतःहून काढून टाकले व प्लांट साठी जागा मोकळी करून दिली. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. रमेश उपासे मृत असून त्यांचे निकामी शेड पाडणे सुरू आहे. त्यामुळे वॉटर फिल्टर साठी आवश्यक तेवढी जागा उपलब्ध झाली आहे.

– श्रेयाच्या राजकारणातून पेपरबाजी

– नागपूर विचार नामक एका वृत्तपत्रातून माझे विरुद्ध ‘ बेला ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार सरपंचाची मनमानी ‘ अशा आशयाची बातमी आली होती. त्यामध्ये तथ्य नाही. कारण वनविभागाने हस्तांतरित केलेल्या जागेवरील अतिक्रमण काढणे व नोटीस देण्याचा मला अधिकार आहे. माझी वाढती लोकप्रियता काही राजकारण्यांना पहावल्या जात नसल्यामुळे त्यांनी माझी बदनामी व्हावी. यासाठी बातमी दिली आहे. ती बिन बुडाची व निराधार आहे. नोटीस देताच स्वतःहून अतिक्रमण काढणाऱ्या नागरिकांचा मी आभारी आहे. जागा मोकळी झाल्याने लवकरच प्लांट पूर्ण होईल.

– अरुण बालपांडे, सरपंच ग्रामपंचायत बेला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागरीकांचे जीवन सुधारण्याच्या उद्देशानेच प्रत्येक निर्णय घेतला आहे, प्रत्येक कृती केली आहे: पंतप्रधान

Tue May 30 , 2023
मुंबई :-जनसेवेत सरकारची 9 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनम्रता आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे. आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणाले; “आज आम्ही देशसेवेची 9 वर्षे पूर्ण करत असताना, माझ्या मनात विनम्रता आणि कृतज्ञता दाटून आली आहे. घेतलेला प्रत्येक निर्णय, केलेली प्रत्येक कृती, लोकांचे जीवन सुधारण्याच्या उद्देशानेच केली गेली आहे. विकसित भारताच्या उभारणीसाठी आम्ही सतत अधिक कठोर परिश्रम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!