बुडणाऱ्या मुलीला तत्परतेने वाचवून दिले जीवदान

– अंबाझरी पोलीस ठाणे, नागपूर शहर

नागपूर :- पोलिस ठाणे अंबाझरी येथील फुटाळा तलाव येथे आज दिनांक 16/08/2024 रोजी दुपारी 13.15 वाजताचे सुमारास मुलगी नावे गायत्री सुभाष सुपटकर वय 18 वर्ष राहणार न्यू नरसाळा ,कृष्णनगरी च्या बाजूला, नागपूर ही राहते घरी वाद झाल्यामुळे रागाचे भरात येऊन फुटाळा तलाव येथे उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला असता पेट्रोलिंग वरील बीट मार्शल Pc/6392 राजेंद्र सोमकुवर , PN/7073 विनोद सानप यांनी तात्काळ तेथे उपस्थित पोहणारा मुलगा नामे कुणाल राकेश चौधरी वय २० वर्ष राहणार हजारी पहाड, गिट्टीखदान यांनी तात्काळ उडी मारून सदरच्या मुलीस सुखरूप बाहेर काढून तिचे प्राण वाचविले, सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांना देऊन मुलीचे वडील नावे सुभाष सुपटकर वय 48 वर्षे यांना देऊन त्यांना पोलीस ठाणे येथे बोलावून त्यांचे व मुलीचे सांत्वन करून समुपदेशन करून पुन्हा अशाप्रकारे आत्महत्या करण्याचा प्रयत्न न करण्याबाबत ताकीद देऊन घरी सोडण्यात आले, जीव वाचवणारा मुलगा नामे राकेश चौधरी व बीटमार्शल यांना पोलीस ठाणे येथे बोलावुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्याचे कौतुक करून सत्कार केला,

अशाप्रकारे अंबाझरी पोलीस ठाण्याचे बीट मार्शल यांनी अत्यंत सतर्कतेने तात्काळ दखल घेऊन एका बुडणाऱ्या मुलीला स्थानिकांच्या मदतीने जीवदान देण्याचे उल्लेखनीय काम केले आहे, यावेळी वनकर्मचाऱ्यांचे अध्यक्ष अजय पाटील हे सुद्धा उपस्थित राहून त्यांनी सुद्धा जीवदान देणाऱ्या मुलाचे कौतुक केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महिला बचतगटांच्या उत्पादनांना राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी

Sat Aug 17 , 2024
– एआय आधारीत डिजीटल मार्केटींग ॲप करावे – शहरी भागात बचत गटांची संख्या वाढवावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश मुंबई :- राज्यातील महिला बचतगट आणि महिला उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांना राष्ट्रीयस्तरावर बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी आर्टीफिशिअल इंटेलिजन्स आधारीत डिजीटल मार्केटींग ॲप करावे. शहरांमध्ये बचतगटांची संख्या वाढवावी. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मैदांनावर सुटीच्या दिवशी बचतगटांसाठी स्टॉलची व्यवस्था करून द्यावी. ग्रामीण भागातील बचत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com