भंडारा :- जिल्हयातील सर्व बॅकाच्या कामाचा आढावा नुकताच जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी घेतला.यामध्ये त्यांनी बॅकेमध्ये प्रलंबित असलेल्या सर्व प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी दिले.यावेळी लीड बॅक मॅनेजर गणेश तईकर,सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.जूनपासून बॅकेतील विविध शासकीय योजनांच्याबाबत प्रलंबित प्रकरणांचा आढावा त्यांनी घेतला.
घर घर किसान क्रेडीट कार्ड अभयाना व प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना व जीवन ज्योती विमा योजनांचे ग्रामपंचायतीमध्ये कॅम्प लावण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.1 ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 दरम्यान या योजनेचा लाभ गावोगाव पोहोचविण्याचे निर्देश त्यांनी दिले.
या बैठकीला आरबीआयचे जयस्वाल,विदर्भ केाकण ग्रामीण बॅकेचे क्षेत्रीय प्रबंधक धकाते ,नाबार्डचे जिल्हा प्रबंधक देवेंद्र हेडाऊ तसेच ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक,विवेक बोंद्रे तसेच जिल्हा उदयोग केंद्राचे व्यवस्थापक हेमंत बदर तसेच सर्व महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक उपस्थित होते.