नागपूर :- राहुल मदने, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ क्रमांक ०२, नागपुर शहर यांनी, गुन्हेगार नामे १) मोहम्मद इरशाद वल्द अब्दुल वहाब उर्फ वादशाहा कुरेशी, वय ४४ वर्ष, गडडीगोदाम अल कुरेशी मस्जिद जवळ पो. ठाणे सदर, नागपुर शहर २) तनवीर कुरेशी वल्द सलीम हाजी कुरेशी, वय ३४ वर्ष, रा. गडडीगोदाम मस्जिद जवळ, पो. ठाणे सदर, नागपुर शहर ३) मो. तहसीन रजा कुरेशी, वय ३१ वर्ष, रा. चौधरी मस्जिद जवळ, कुरेशीनगर भाजी मंडी कामठी नागपुर यांनी गोवंशीय जनावरे कत्तली व वाहतुक करणारे इसमांची टोळी केल्याने नमूद आरोपी हे गुंडवृत्तीचे इसम असुन त्यांचे मुळे इतरांचे जिवीत किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती नेहमी आपल्या गटातील संकल्पीत साथीदारांच्या मदतीने करतात. अशा गुन्हयांमूळे त्यांची परिसरात दहशत निर्माण झालेली असून त्यांच्या अशा वेकायदेशीर वागण्यामुळे व वाईट कृत्यामुळे सदर परिसरातील नागरीकांमध्ये असुरक्षीततेची भावना निर्माण झाली असून लोकांचे जिवीतास व मालमत्तेस त्यांचे पासून धोका निर्माण झालेला आहे. सदर टोळीतील हदपार इसमांची पार्श्वभुमी पाहता त्यांना कायद्याचा आदर नसून ते कायद्यास न जुमानता परिसरात प्रतिबंधीत गोवंश जातीचे मास विक्री करतात, त्यांचे विरूध्द सदर पो ठाणे व हिंगणा येथे दाखल आहेत. त्यांची गुन्हेगारी प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत बालली आहे. त्यांचे गुन्हेगारी प्रवृत्तीला वेळीच आळा बसावा म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई करून सुध्दा त्यांने प्रवृत्तीत काहीच सुधारणा झाली नाही. त्यांचे पासून नागरीकांमध्ये दहशत निर्माण झालेली आहे. त्यांचे विरुध्द उघडपणे कोणीही तकार देत नाहीत. त्यामुळे सार्वजनीक सुव्यवस्था धोक्यात आली आहे. त्यांच्या कृत्यामुळे भविष्यात सुध्दा परिसरातील रहिवासी लोकांचे मालमत्तेस जिवीतास धोका, भय, ईजा अशी असुरक्षिततेची भावना निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याने सदर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष ठाकरे यांनी नमूद गोवंशीत कत्तल, वाहतुक, गोमांस विक्री करणारे इसमांचे विरुध्द त्यांना पो ठाणे हद्दीतुन हदपार करण्याकरीता पोलीस आयुक्त नागपूर शहर यांचे निर्देशाप्रमाणे राहुल मदने पोलीस उप आयुक्त परि क. २ नागपूर शहर यांचे कार्यालयात प्रस्ताव सादर केला असता, वर नमुद तिन्ही आरोपी इसमांना ६ महीन्या करीता नागपूर शहरातुन हदपार करण्याचे आदेश पारित केले. असून नमूद तिन ही दि. २८१०.२०२४ रोजी गुंड इसम क्र. १ मोहम्मद इरशाद वल्द अब्दुल वहाव उर्फ बादशाहा कुरेशी, वय ४४ वर्ष यास पो. ठाणे कोल्हापुरी गेट, जि. अमरावती शहर तसेच दि. २९.१०.२०२४ रोजी आरोपी क्र. ०२ तनवीर कुरेशी वल्द सलीम हाजी कुरेशी वय ३४ वर्ष तसेच क्र. ०३ मो. तहसीन रजा कुरेशी, वय ३१ वर्ष यांना पो. ठाणे रामनगर, जि. चंद्रपुर येथे पाठवुन त्यास नागपूर शहरातुन ६ महीन्या करीता हदपार करण्यात आलेले आहे. करीता नागपूर शहरातील सर्व नागरीकांना सदर पो ठाणे नागपूर शहर यांचेकडून आव्हाण आहे की, नमूद इसम हे नागपूर शहरात आढळून आल्यास त्याबाबत डायल ११२ यावर पोलीस नियंत्रण कक्ष अथवा सदर पोलीस ठाणेचे संपर्क कमांकावर ०७१२-२५६२७०७, २५२१२००, २५६६६१९ यावर माहीती देण्यात यावी.