संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
बहुजन रिपब्लिकन एकता मंच तर्फे निर्णयाचे स्वागत
कामठी ता प्र 14 :- युती सरकार असताना सरपंच आणि नगराध्यक्षाची निवड ही थेट जनतेतून केली जात होती मात्र हा निर्णय राज्याच्या तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने रद्द केला होता. मात्र राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारची आज पार पडलेल्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले ज्यामध्ये राज्यातील ग्रामपंचायत सरपंचाची ,तसेच नगर पंचायत , नगर परीषद नगराध्यक्षची थेट जनतेमधून निवड होणार असल्याचे जाहीर झाले आहे.यानुसार कामठी नगर परिषदच्या होणाऱ्या आगामी निवडणूकीत नगराध्यक्ष हा थेट जनतेतून निवडून येणार आहे. हा निर्णय सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा असल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचे बहुजन रिपब्लिकन एकता मंच च्या वतीने स्वागत करण्यात येत असल्याचे मत बरीएम चे विदर्भ महासचिव व कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष अजय कदम यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला व्यक्त केले.