अरोली :- खात – रेवराल जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या घोटमुंढरी येथे पाच दिवसीय भव्य वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्या दिनांक 25 जानेवारी शनिवारला सांस्कृतिक उद्घाटनीय कार्यक्रम सायंकाळी चार वाजता आयोजित केलेला आहे.
गट ग्रामपंचायत घोटमुंढरी व सर्व ग्रामस्थ तसेच जिल्हा परिषद सेमी इंग्रजी आदर्श उच्च प्राथमिक शाळा व कॉन्व्हेंट घोटमुंढरी यांचे संयुक्त विद्यमानाने 23 जानेवारी ते 27 जानेवारी दरम्यान पाच दिवसीय वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव शाळेच्या आवारात सुरू आहे. 23 जानेवारी गुरुवारला सकाळी 11 वाजता पासून ते सायंकाळ सुट्टीच्या वेळेपर्यंत विद्यार्थ्यांचे सांघिक व वैयक्तिक खेळ तसेच बौद्धिक खेळ, 24 जानेवारी शुक्रवारला सकाळी 11 वाजता पासून ते सायंकाळी शाळेच्या सुट्टीच्या वेळेपर्यंत विद्यार्थ्यांचे व पालकांचे मनोरंजक खेळ घेण्यात आले. दोन्ही दिवशी विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभाग पहावयास मिळाला, त्या कार्यक्रमाचे फोटो व व्हिडिओ शाळा समितीचे अध्यक्ष उदय पांडे यांनी सोशल मीडियावर वायरलही केले.
उद्या 25 जानेवारी शनिवारला सायंकाळी चार वाजता सांस्कृतिक उद्घाटनिय कार्यक्रमाचे उद्घाटक माजी जिल्हा परिषद सदस्य राधा मुकेश अग्रवाल, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सभापती स्वप्नील श्रावणकर, विशेष अतिथी माजी पंचायत समिती सदस्य दुर्गा ठाकरे ,दीपक गेडाम ,मुकेश अग्रवाल, घोटमुंडरी सरपंच चंदा गेडाम, उपसरपंच श्याम वाडीभस्मे, ग्रामपंचायत सदस्य गण विलास पटले, शंकर पटले, अरविंद भोयर, मौसमी घरडे, पूजा पटले, संगीता चामट ज्योत्सना रावते ,सचिव ऋचा जगझापे ,तंटामुक्त अध्यक्ष धनसिंग पटले, पोलीस पाटील रामकृष्ण क्षीरसागर, माजी सरपंच प्रतिभा पटले, गट विकास अधिकारी विजय झिंगरे, गट शिक्षणाधिकारी कुमारी किरण चीनकुरे, पोलीस निरीक्षक स्नेहल राऊत, खात केंद्रप्रमुख अरविंद भिवगडे, सह गावातील, परिसरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पुढारी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाच्या लाभ घेण्याचे आव्हान शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उदय पांडे, उपाध्यक्ष कवीश श्रावणकर, सदस्यगण विलास पटले, शंकर पटले, अनिल ढोलवार, परमवीर गजभिये, प्रवीण राऊत, गोपाल पटले, नीता घरडे ,रेखा क्षीरसागर ,अपर्णा घरडे ,आरती श्रावणकर, लता पटले ,रत्नमाला एटीकुंभरे, उषा वाडीभस्मे ,सिद्धार्थ वासनिक, सचिव व शाळेचे मुख्याध्यापक शेषराव आंबिलढूके तथा सर्व शिक्षकवृंद व पालकवर्ग जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा घोटमुंढरी यांनी केले आहे.