अरोली :- येथून जवळच असलेल्या पिंपळगाव येथे पिंपळगाव /महालगाव नदी किनाऱ्यावरील ग्राउंडवर मागील आठ जानेवारीपासून क्रिकेटचे सामने खेळले जात होते, त्या सामन्यांच्या समारोपात उद्या दुपारी दोन वाजता फायनल सामना व बक्षीस वितरणाने होणार आहे.
19 जानेवारी रविवारला सकाळी दहा वाजता पासून सेमी फायनल चे सामने एम एस सी बी अरोली यांच्याविरुद्ध जाणता राजा पिंपळगाव, तर देवमूढंरी विरुद्ध ईजनी असे सामने रंगणार असून या सेमी फायनल च्या विजेत्यांमधून दोन वाजता फायनल होणार असून विजेत्या टीमला खासदार श्याम कुमार बर्वे ,जिल्हा परिषद सदस्य योगेश देशमुख यांच्याकडून प्रथम पुरस्कार 15001 रुपये, जाणता राजा आदर्श मंडळ पिंपळगाव यांच्याकडून द्वितीय पुरस्कार दहा हजार एक पिंपळगाव सरपंच निशा शंकर चापले यांच्याकडून तृतीय पुरस्कार 7001 रुपये, माजी सरपंच खात कैलास वैद्य यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज 1000 रुपये, परवेज झडीये खात यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच हजार रुपये, मयंक अग्रवाल खात यांच्याकडून बेस्ट बॅट्समन हजार रुपये, नरेंद्र मोदी महालगाव यांच्याकडून बेस्ट बॉलर 1000 रुपये मान्यवरांच्या हस्ते वितरित केले जाणार असून या क्रिकेट सामन्यांच्या समारोपीय कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जाणता राजा (आदर्श )क्रिकेट टीमचे अध्यक्ष आशिष चाफले ,उपाध्यक्ष यश (चिंटू) सिंगनजुडे, सचिव मनोज मोहने कर्णधार अनिश झडिये, उपकर्णधार पंकज मेश्राम सह समस्त पदाधिकाऱ्यांनी केले आहे.